एकनाथ शिंदेंचे परतीचे दोर शिवसेनेनं कापले?; मोठ्या पदावरून केली हकालपट्टी
पक्षाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर शिवसेनेनं पहिली कारवाई केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या गर्दीतून गायब झालेल्या एकनाथ शिंदे थेट सुरतला जाऊन पोहोचले. सकाळी समोर आलेल्या या माहितीने राज्यातील राजकीय […]
ADVERTISEMENT

पक्षाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर शिवसेनेनं पहिली कारवाई केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या गर्दीतून गायब झालेल्या एकनाथ शिंदे थेट सुरतला जाऊन पोहोचले. सकाळी समोर आलेल्या या माहितीने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे सरकारच्या अस्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे.
शिंदेंचं बंड: ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास’, शरद पवार अॅक्शन मोडमध्ये?
गुजरातमधील सुरतमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे मुक्कामला असून, त्यांच्यासोबत जवळपास २० पेक्षा अधिक आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या मंत्री, आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेसमोर नवं संकट उभं केलं आहे.