शिवसेनेचा दसरा मेळावा पहिल्यांदाच ‘शिवाजी पार्क’ ऐवजी दुसऱ्याच जागेवर होणार

मुंबई तक

कोरोना काळ वगळता इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा (shiv sena Dasara Melava 2022) दादरमधील शिवाजी पार्कऐवजी दुसऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनेशी सलग्नित भारतीय कामगार सेनेनं शिवसेना मेळावा बीकेसी जवळील एमएमआरडीए मैदानात घेण्याची परवानगी मागितली आहे. शिवसेनेत झाली फूट आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाकडून केला जाणारा दावा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना काळ वगळता इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा (shiv sena Dasara Melava 2022) दादरमधील शिवाजी पार्कऐवजी दुसऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनेशी सलग्नित भारतीय कामगार सेनेनं शिवसेना मेळावा बीकेसी जवळील एमएमआरडीए मैदानात घेण्याची परवानगी मागितली आहे.

शिवसेनेत झाली फूट आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाकडून केला जाणारा दावा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच विजयादशमी जवळ येत असून, त्यानिमित्ताने होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

गणेशोत्सवाच्या आधीच शिवसेनेनं महापालिका प्रशासनाला शिवसेना दसरा मेळाव्यासंदर्भात दोन पत्र दिली आहेत. गणेशोत्सव पार पडल्यानंतर शिवसेनेच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल, असं मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.

‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० दिवसीय राज्यव्यापी दौऱ्यावर

हे वाचलं का?

    follow whatsapp