Sanjay Raut: ‘योगी-भोगी’वरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा
मुंबई: योगी सरकारने उत्तर प्रदेशातील 11 हजार भोंगे हटविण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड कौतुक केलं. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरुन राज्यातील ठाकरे सरकारवर मात्र टीका केली. याच मुद्द्यावरुन शिवसेना खास संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरेंना जोरदार टोमणा लगावला आहे. ‘आता योगी कोण, भोगी कोण आणि हे योगी-भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं अचानक हा […]
ADVERTISEMENT
मुंबई: योगी सरकारने उत्तर प्रदेशातील 11 हजार भोंगे हटविण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड कौतुक केलं. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरुन राज्यातील ठाकरे सरकारवर मात्र टीका केली. याच मुद्द्यावरुन शिवसेना खास संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरेंना जोरदार टोमणा लगावला आहे.
ADVERTISEMENT
‘आता योगी कोण, भोगी कोण आणि हे योगी-भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं अचानक हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करायची असेल तर करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा.’ असं म्हणत संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘भोंग्यांवरुन वातावरण तापविण्याचा प्रयत्न’
‘उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरविण्यात आलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं जे काही पालन करायचं आहे ते फक्त करण्यात आलेलं आहे. अशाप्रकारचं पालन महाराष्ट्रात करावं अशी सरकारची भूमिका आहे. मला असं वाटतं. महाराष्ट्र सरकार न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं. त्यामुळे हा भोंग्यांचा विषय आहे हा राजकीयदृष्ट्या तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे.’
ADVERTISEMENT
‘आता योगी कोण, भोगी कोण आणि हे योगी-भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं अचानक हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करायची असेल तर करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भोंगा विषयावरुन मनसे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
‘आपल्याच देशामधील परिस्थितीचा मंथन आणि चिंतन झालं पाहिजे’
‘कोणताही समाज, धर्म हा हिंसेचा मार्ग अकारण अवलंबत असेल तर मला असं वाटतं तो समाज आणि धर्म अधोगतीला जातो. हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे विधान केलं आहे, जी भूमिका घेतली आहे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे आणि त्यावर आपल्याच देशामध्ये मंथन आणि चिंतन केलं पाहिजे.’ असा सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी दिला.
‘महाराष्ट्राला काय सभेचं वावडं आहे का?’
‘या महाराष्ट्रात अनेक सभा होतात आम्ही घेतो, राष्ट्रवादी काँग्रेस घेतं. परवा कोल्हापूरला किती मोठी सभा झाली ते आपण पाहिलं असेल. महाराष्ट्राला काय सभेचं वावडं आहे का? त्या दिवशी महाराष्ट्रात सहा सभा आहेत वेगवेगळ्या. पोलीस आयुक्त आणि प्रशासन सभेबाबत निर्णय घेतील.’ असंही राऊत यावेळी म्हणाले.
किरीट सोमय्यावर पुन्हा एकदा निशाणा
‘एक गुन्हेगार आहे जो विक्रांत घोटाळ्यातून जामिनावर सुटलाय आणि दिलासा घोटाळ्यातील लाभार्थी आहेत. असे जे लाभार्थी असतात त्यांच्याकडे तुम्ही काय लक्ष देता. ज्यांनी पैशाचा अपहार केला आहे.’
‘देशाचा पैसा आयएनस विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये या बाप-बेट्यांनी गोळा केले आहेत. ते तुरुंगात असायला पाहिजे खरं म्हणजे. पण या देशात जो दिलासा घोटाळा सुरु आहे त्यातील ते एक लाभार्थी आहेत.’ असं म्हणत राऊतांनी सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवला.
‘प्रमुख नेत्यांना टार्गेट करण्याचं कारस्थान’
‘भावना गवळी यांना समन्स पाठवलं त्याबाबत आम्ही काय करायचं ते पाहू. एखाद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना टार्गेट करण्याचं हे कारस्थान आहे. पण काही झालं तरी महाविकास आघाडीचे नेते आपला संघर्ष कायम ठेवतील.’ असं राऊत म्हणाले.
‘कोणी योगी, कोणी भोगी.. तर कुणी मानसिक रोगी’, आव्हाडांचं अमृता फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर
देशद्रोहाच्या मुद्द्यावर काय म्हणाले राऊत?
‘पवार साहेबांनी जे म्हटलं आहे त्याच्याशी देखील मी सहमत आहे. कारण पवार साहेबांनी देशपातळीवरचं मत व्यक्त केलं आहे. फक्त महाराष्ट्राबाबत बोललेले नाहीत. हा जो कायदा आहे देशद्रोहाचा त्याचा देखील केंद्रीय यंत्रणांमार्फत किती गैरवापर झाला आहे ते आपण जेएनयूपासून उत्तरप्रदेश ते आसामपर्यंत पाहू शकतात.’
‘महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव दंगलीनंतर ज्या काही लोकांवर हा गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात देखील देशात चर्चा सुरु आहे. आता प्रश्न राहिला एका दाम्पत्याचा. या दाम्पत्याने महाराष्ट्रामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ भडकविण्यासाठी एक मोठं कारस्थान रचलं होतं. त्याला एका राजकीय पक्षाची ताकद होती. त्यामुळे आज त्या सगळ्या गोष्टींचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे त्यावर काही वाद होऊ नये.’ अशी प्रतिक्रिया राऊतांनी यावेळी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT