Shiv Sena MLA: सेक्सटॉर्शन प्रकरणी शिवसेना आमदार कुडाळकरांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई तक

एजाज खान, मुंबई मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली असून आता याबाबत स्वत: आमदार कुडाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मी मुंबई पोलिसांची मदत घेतली त्यामुळेच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.’ असं कुडाळकर म्हणाले आहेत. पाहा आमदार मंगेश कुडाळकर नेमकं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एजाज खान, मुंबई

मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली असून आता याबाबत स्वत: आमदार कुडाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मी मुंबई पोलिसांची मदत घेतली त्यामुळेच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.’ असं कुडाळकर म्हणाले आहेत.

पाहा आमदार मंगेश कुडाळकर नेमकं काय म्हणाले.

‘हा प्रकार उघडकीस यावा आणि हे रॅकेट पकडलं जावं या एका भावनेने मी हे संपूर्ण प्रकरण मुंबई सायबर क्राइमला सुपूर्द केलं. जेव्हा मला अशा प्रकारचा मेसेज यायला सुरुवात झाली की, मदतीची अपेक्षा शैक्षणिक किंवा आरोग्याच्या दृष्टीने. त्यानंतर ज्या प्रकारे ते बोलत होते त्यावरुन मला जरा शंका आली. त्यामुळे मी तातडीने माझ्या मित्रांच्या सल्ल्याने मुंबई सायबर क्राइमला तक्रार केली.’

हे वाचलं का?

    follow whatsapp