संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील शिवसैनिकांना काय सांगितलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून खासदार संजय राऊत यांची चौकशी सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी हा महाराष्ट्र, हिंदू आणि शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय म्हणाले?

“ज्यांना आपण मोठ केलं, ती मोठी झालेली माणसं तिकडे गेली. आज जे काही लोभापायी, दमदाटीपायी तिकडे जात आहेत. मी कालच राज्यपालांबद्दल एक पत्रकार परिषद घेतली. ते पद मोठं आहे, पण त्या पदाचा मान जसा आपण राखतो. तसंच त्या पदावर बसणाऱ्या माणसानेही राखला पाहिजे. कालपासून त्यांची सुरूवात झाली आहे. त्याचा दुसरा टप्पा आपण इथे बोलत असताना तिकडे संजय राऊतांच्या घरी ईडीचे पाहुण बसले आहेत. हे काय चाललंय, हे काय कारस्थान आहे.”

“काल जे कोश्यारी बोलले. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अवमान केला. महाराष्ट्राचं मीठ खाऊन नमक हरामी त्यांनी केली. त्याचाच हा पुढचा आहे. म्हणजे भाजपचं जे कारस्थान आहे की, हिंदूंमध्ये फूट पाडायची. मराठी-अमराठी करायचं. मराठी माणसाला चिरडून टाकायचं. शिवसेना का संपवायची, तर हिंदूंना आणि मराठी माणसाला ताकद देणारी ही संघटना. ती एकदा संपली की, महाराष्ट्रात त्यांना मोकळ कुरण.”

संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरेंनी काय केलं विधान?

“ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करायची आहे. पण ते पुसणार नाही. आजसुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखठोक लिहिलेलं आहे. त्यात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सगळं कारस्थान इतकं निर्लज्जपणे सुरू आहे. लाजलज्जा शरम सोडून हे कारस्थान सुरू आहे. दमनशाही, दडपशाही सुरू आहे. हिंदुत्व हा शब्द बोलायला कुणाचं धाडस होत नव्हतं त्यावेळी शिवसेना प्रमुख हे एकमेव मर्द होते. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला, तेव्हा हे कुठे होते. तेव्हा तर शिवसेनाप्रमुखांच्या हातात सत्ताही नव्हती.”

हे वाचलं का?

“आज जे त्यांच्या चरणी दास झाले आहेत. त्यांची प्रतिक्रिया काय होती की आम्ही पत्र लिहू. अशा बुळबुळीत प्रतिक्रिया होती. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल पण तुमचे जोडे आम्ही पुसरणारच, अशी शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघेंची शिकवण नव्हती. शिवसैनिक आजही ताड मानेनं उभा आहे.”

एकेकाळी मित्र असलेल्या पक्षाचाच गळा घोटण्याचा प्रयत्न होतोय, भाजपवर उद्धव ठाकरेंची टीका

“मी वारंवार सांगतोय. जर या देशात लोकशाहीचा खून होणार असेल. आपले सरन्यायाधीश बोलले की विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका. आता विरोधी पक्ष तर लांबच आहे, पण एकेकाळचा मित्रपक्ष होता. त्याचाही गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

“संजय राऊतांच्या घरी आज जी ईडीची चौकशी सुरू आहे. हे तेच सुरू आहे. हा हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा गळा घोटायचा आहे. त्याचंच हे कारस्थान आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT