Uddhav Thackeray शरद पवारांच्या आशीर्वादाने CM मग NCP कुणामुळे सत्तेत? -शिवसेना

मुंबई तक

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेना यांच्यात वाद पेटला आहे हे आता दिसून येतं आहे. कारण अमोल कोल्हे यांनी जी टीका केली त्या टीकेला आता शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. पुण्यातील शिरूर मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेना यांच्यात वाद पेटला आहे हे आता दिसून येतं आहे. कारण अमोल कोल्हे यांनी जी टीका केली त्या टीकेला आता शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. पुण्यातील शिरूर मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कुणाच्या सहकार्याने सत्तेत? असा प्रश्न किशोर कान्हेरे यांनी विचारला आहे.

आणखी काय म्हणाले आहेत किशोर कान्हेरे?

अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे बहुतेक. तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधीकधी स्मरणशक्ती विसरतात. अमोल कोल्हे यांचं आज तसंच झालं. आपण उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो याचाच त्यांना विसर पडला आहे. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की असे होते. अमोल कोल्हे ज्या उद्धव ठाकरेंमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळं चाखायला मिळाली किमान त्यांना विसरू नका.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार हे देखील उद्धव ठाकरे यांच्याशी सल्ला मसलत करतात. तुम्ही कशाला विचार करता. तेवढी तुमची कुवतही नाही आणि क्षमताही नाही. दिग्दर्शकाने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा. फार डोके चालवू नका असा सल्लाही किशोर कान्हेरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला आहे.

हे वाचलं का?