Kolhapur Bypoll: ‘काँग्रेसने काय वाईट केलंय, जेवढं भाजप वाईट वागली.. मतदान काँग्रेसलाच’, शिवसेना नेत्याचा एल्गार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे आणि शिवसैनिकांनी तगादा लावला आहे की, ती जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामुळे शिवसेनेलाच ती जागा मिळाली पाहिजे. राजेश क्षीरसागर शिवसेनेचे माजी आमदार उ. कोल्हापूरचे त्यांच्याकडे काल शिवसैनिक तिकडे पोहचले होते. त्यांनी मागणी लावून धरली होती की, महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचं नुकसान होतं आहे. त्या ठिकाणी ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. दुसरीकडे मविआचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला मंजुरी देण्यात आली.

मविआ विरुद्ध भाजप अशी लढाई इथं होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर मविआमध्ये सगळं आलबेल आहे का हे सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची झाली आहे. त्यामुळेच राजेश क्षीरसागर यांना खास त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. याच बैठकीआधी राजेश क्षीरसागर यांनी मुबंई Tak ला विशेष मुलाखत दिली आहे. जाणून घ्या त्यावेळी ते नेमकं काय-काय म्हणाले.

प्रश्न: तुम्ही कोल्हापूरच्या शिवसैनिकांची मनधरणी कशी करणार आहात?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजेश क्षीरसागर: मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात बैठक होणार आहे. एक लक्षात घ्या की, महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेला तीनही पक्षापैकी एखाद्या पक्षाचा आमदाराचं निधन झालं तर त्याच पक्षाचा उमेदवार द्यायचा हा आघाडीचा करार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने कराराप्रमाणे ही जागा काँग्रेसला देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरामध्ये एक मेळावा झाला त्यात आम्ही सर्वच पदाधिकारी होतो. यात असा सूर आला की, कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जी जागा सोडावी अशी मागणी झाली होती.

यामुळे कार्यकर्त्यांना असं वाटू लागलं की, सर्वांचीच एकमुखाने मागणी असल्याने ही जागा निश्चितपणे शिवसेनेला मिळेल. त्यामुळे ज्यावेळेस काँग्रेसला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये थोडा संभ्रम पसरला, नाराजी झाली. पण गेल्या दोन दिवसात आम्ही कार्यकर्त्यांना समजावून सांगत आहोत. निश्चितपणे यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जाधव यांचा विजय होईल याची खात्री आहे.

ADVERTISEMENT

प्रश्न: मला तुमच्याशी बोलताना जाणवतंय की, नेत्यांमध्ये कुठे तरी समजूतदारपणा दिसतोय. पण याबाबत कार्यकर्ते मात्र सहमत दिसत नाहीत.

ADVERTISEMENT

राजेश क्षीरसागर: 2014 च्या निवडणुकीत मला 70 हजार मतं मिळाली होती. काँग्रेसला 47 आणि भाजपला 42 हजार. 2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांनी एकत्र येऊन भाजपने माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि माझा पराभव केला. हे निश्चितपणे समसमान शत्रू जरी असले तरी आज महाविकास आघाडीचे प्रमुख हे उद्धव ठाकरे काम पाहत आहे. मला खात्री आहे की, कोल्हापूरचा शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांना मानणारा आहे. त्यामुळे शिवसैनिक मातोश्रीचा आदेश निश्चितपणे कोणत्याही परिस्थितीत नाकारणार नाही आणि काँग्रेस उमेदवाराला सर्व शिवसेनाच निवडून आणेल याची खात्री आहे.

प्रश्न: भाजपची मतं तुम्हाला मिळाली असती तर 2019 साली तुम्ही निवडून गेला असतात, पण तसं का झालं नाही?

राजेश क्षीरसागर: भाजप हा आमचा एक नंबरचा शत्रू आहे. भाजपने आमच्यासोबत वेळोवेळी गद्दारी केलेली आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. या आघाडीची सत्ता आल्यानंतर देखील भाजप कशा पद्धतीने केंद्र सरकारच्या सर्व संस्थांद्वारे आम्हाला त्रास देत आहे. राज्यपालांकरवी जे काही चालू आहे ते पण आपण पाहत आहात. म्हणजे सरकार अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहे.

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशात सर्वात चांगली कामगिरी असणारे मुख्यमंत्री म्हणून मानलं गेलं. याचा अर्थ महाविकास आघाडी सर्व चांगली चालली आहे. अडीच वर्षात कोव्हिडची परिस्थिती असेल, विविध नैसर्गिक आपत्ती असेल त्याला अतिशय संयमीपणे उद्धवजी आणि इतर त्यांच्या नेत्यांनी सक्षमपणे तोंड दिलेलं आहे.

हे सरकार पडत नाही हे पाहून सरकार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न झाला म्हणून महाविकास आघाडीत काही आलबेल नाही असं पसरवलं जातंय. यात भाजप माहिर आहे. भाजपने आमची काळजी करु नये. ही पाच वर्ष नव्हे तर पुढची पाच वर्ष देखील महाविकास आघाडी पूर्ण करेल.

प्रश्न: तुम्ही असं म्हणतात पण.. कार्यकर्ते आक्रमक आहेत ते ऐकून घेण्यास तयार नाहीत. कार्यकर्त्यांचा राग तुम्ही कसा शमवणार?

राजेश क्षीरसागर: शिवसैनिक हा प्रामाणिक असतो. पाठीत वार करणारा नसतो. अंगावर घेणारा असतो. शिवसैनिकांची दोन-तीन दिवस चालू राहिल पण शिवसैनिक शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो काही निर्णय देतील.. खरं म्हणजे त्यांनी आदेश दिलेला आहे. तो तंतोतंत पाळून कोल्हापूर शहरात महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही विजयी करु.

प्रश्न: कोल्हापूरमध्ये ही नेमकी परिस्थिती का आली? कुठं अतंर्गत वाद आहे का?

राजेश क्षीरसागर: भाजप हे कुणाचंही नाहीए. फक्त स्वत:च्या स्वार्थापुरता वापर करणारा आहे. नांदेडला आमच्या माजी आमदाराला त्यांनी बाद केलं असं म्हणतो. एवढे आम्ही दुधखुळे नाही आहोत. भाजप जे काही करतं ज्या काही चाली आहेत हे काय आम्हाला समजत नाही? संपूर्ण महाराष्ट्राला कळतंय भाजपचं काम कसं चाललं आहे ते. येणाऱ्या काळात मतदार भाजपला त्यांची जागा दाखवतील.

ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडावा लागणं दुदैवी – राजेश क्षीरसागर

प्रश्न: महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे शिवसेनेनं एकटं राहिलेलं बरं किंवा भाजपसोबत गेलेलं बरं अशी भावना तर कार्यकर्त्यांमध्ये नाही ना?

राजेश क्षीरसागर: राज्य चालवत असताना काही गोष्टींसाठी तडजोड करावी लागते. सहाजिकच आहे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी ती आमची जबाबदारी आहे ना नाराजी दूर करण्याची. शिवसेना आणि कोल्हापूरचं जे नातं आहे ते सर्वश्रुत आहे. हा शिवसैनिक मातोश्री आणि शिवसेनेशी कधीही गद्दारी करु शकत नाही. येणाऱ्या निवडणुकीत हे आपल्याला दिसून येईल. माझी आपल्या माध्यमातून भाजपला विनंती आहे की, आता तरी हे थांबवा. प्रत्येक वेळी खोटं बोल रेटून बोल.. महाविकास आघाडी डिस्टर्ब करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो मतदार उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे भाजपला त्याचं फळ नक्कीच मिळेल.

प्रश्न: कधी काळी तुमचा गड असलेल्या मतदारसंघात आता तुम्हाला काँग्रेसचा प्रचार करावा लागणार आहे. हे तुम्ही शिवसैनिकांना कसं पटवून देणार?

राजेश क्षीरसागर: एक लक्षात घ्या काही गोष्टी लोकांना माहिती नसतात. म्हणून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, 2019 ला माझा पराभव झाला शिवसेनेने 123 जागा लढल्या त्यापैकी 70 जागी शिवसेनेचा पराभव झाला. त्या 70 पैकी मी एक होतो. तरीही उद्धव ठाकरेंनी मला राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्ष पद दिलं. त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. आणखी काय करायचं नेत्यांनी. आमच्यावर त्यांनी कधीही अन्याय केलेला नाही.

माझं वय 53 आहे. पण मी वयाच्या 16 व्या वर्षापासून शिवसेनेत आहे. मला एवढ्या वर्षाचं राजकारण चांगलं माहित आहे. भाजप शिवसेनेचं बोट धरुन या राज्यात वाढली. ज्यावेळी 2014 ला मोदींच्या हवेमुळे, लाटेमुळे महाराष्ट्रात 123 जागांसह भाजप मोठा पक्ष झाला. त्यावेळेला शिवसेनेला त्यांनी पुन्हा सत्तेत घेतलं. मी तेव्हा आमदार होतो. यावेळी मी जबाबदारीने सांगतो. भाजपने शिवसेनेच्या कुठल्याही आमदाराचं काम केलं नाही.

शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवण्याचाच प्रयत्न भाजपने त्यावेळी केला आहे. भाजप एवढी वाईट वागली. तर काँग्रेसने असं आमचं काय वाईट केलंय?, महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतोय. अशावेळी शिवसैनिक भाजपला मतदान कसं करेल? आमच्या पक्षप्रमुखांवर टीका, कोणी उठतो-सुटतो टीका करतोय मातोश्रीवर. हे शिवसैनिकांना आवडतंय का? म्हणून शिवसैनिक आज पेटून उठलेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT