आदित्य ठाकरेंचा बुलढाण्यात चित्रा वाघ यांच्याशी तर सिल्लोडमध्ये श्रीकांत शिंदेंशी सामना!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शेतकरी संवाद यात्रा आज (७ नोव्हेंबर) अकोला, बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यात जाणार आहे. आदित्य ठाकरे सकाळी ११.३० मिनिटांनी बाळापूर येथे आणि २ ते ४ या वेळेत मेहकरमध्ये ते शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता ते औरंगाबाद जिल्ह्यातील अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्येही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

ADVERTISEMENT

चित्रा वाघही उद्या बुलढाणा दौऱ्यावर :

आदित्य ठाकरेंप्रमाणेच भाजपच्या महिला मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघही बुलढाणा दौऱ्यावर आहेत. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या आजपासून (७ नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ राजमाता जिजाऊंना सिंदखेडा राजा येथे अभिवादन करुन करणार आहेत. त्यामुळे अकोल्यात ७ नोव्हेंबर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संध्याकाळी श्रीकांत शिंदेंशी होणार सामना :

आदित्य ठाकरे उद्या संध्याकाळी सिल्लोडमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचीही मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासाठी सिल्लोडमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये आज (७ नोव्हेंबर) आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील बहुचर्चित जाहीर सभा रद्द :

आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील बहुचर्चित जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. आंबेडकर चौक मैदानावर होणाऱ्या नियोजित सभेच्या जागी आता छोटेखानी सत्कार आणि लिहाखेडी भागात शेतकरी संवाद यात्रा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडमधील जाहीर सभेच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले होतं. आधी ४० आमदारांवर टीका, मग ५० खोक्यांचा आरोप यामुळे शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले होते. अशाच छोटा पप्पू म्हणतं सत्तार यांनी आदित्य ठाकरेंची हेटाळणी केली. तसंच मतदारसंघात येवून सभा घेऊन दाखवा हे आव्हान सत्तार यांनी दिलं होतं.

ADVERTISEMENT

त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही सत्तार यांचं आव्हान स्वीकारत सिल्लोडमध्ये सभा लावली. आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा होणार, शिवसंवाद यात्रा काढणार असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तार यांनी ७ नोव्हेंबरलाच खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडमध्ये ठेवली.

ADVERTISEMENT

मात्र महावीर चौकातील सभेसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत आदित्य ठाकरे यांना दिलेली परवानगी नाकारण्यात आली. सभेला ते मैदान नाकारण्यात आल्यानंतर पर्याय म्हणून आंबेडकर चौकातील मोकळ्या मैदानात सभेला परवानगी देण्यात आली. पण रात्रीतून सुत्रे हलली आणि सभा रद्द होऊन आता सिल्लोडमध्ये फक्त सत्कार आणि लिहाखेडी भागात शेतकरी संवाद यात्रा असा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT