आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर : कदम, सामंतांची कुंडली काढण्याचे जाधव अन् दळवींचे आव्हान
हिंगोली : उदय सामंत सारखा भंपक माणूस मी बघितला नाही. मागच्या वेळी गाडीवर दगडफेक झाली असं सांगून पोलीस संरक्षण वाढवून घेतलं, थोरात यांच्यावर आक्षेप घेऊन संरक्षण वाढवून घेतलं, त्याअगोदर सुद्धा मला आठवते, अशी काही स्टंटबाजी करायची. उदय सामंतला धमक्या द्यायला, कोण आहे उदय सामंत? कुणाशी प्रामाणिक राहिले? असाही सवाल शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला. […]
ADVERTISEMENT
हिंगोली : उदय सामंत सारखा भंपक माणूस मी बघितला नाही. मागच्या वेळी गाडीवर दगडफेक झाली असं सांगून पोलीस संरक्षण वाढवून घेतलं, थोरात यांच्यावर आक्षेप घेऊन संरक्षण वाढवून घेतलं, त्याअगोदर सुद्धा मला आठवते, अशी काही स्टंटबाजी करायची. उदय सामंतला धमक्या द्यायला, कोण आहे उदय सामंत? कुणाशी प्रामाणिक राहिले? असाही सवाल शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला.
ADVERTISEMENT
तसंच सोळा तारखेला आदित्य ठाकरे रत्नागिरीला येणार आहेत, त्यांच्याच उपस्थिती उदय सामंत काय आहे हे सांगणार, असे आव्हानही जाधव यांनी दिले. सोमवारी भास्कर जाधव शिवसेनेच्या जाहीर सभेनिमित्त हिंगोलीमध्ये होते. यावेळी त्यांना उदय सामंत यांना जाळून टाकू अशी धमकी मिळाली, यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सामंत यांच्यावर टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी आमदार संतोष बांगर आणि शिंदे गटाला लक्ष्य केले.
रामदास कदम, योगेश कदमांंनाही आव्हान :
दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या याच दौऱ्यात माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश यांनी केलेल्या गद्दारीलाही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिला आहे. सध्या राजकारणात उलथापालथ झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचा समाचार घेण्यासाठी आणि बंडखोरीची कीड गाडण्याचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे, असेही दळवी म्हणाले.
हे वाचलं का?
आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर :
आदित्य ठाकरे कोकणात रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून १६ सप्टेंबर रोजी दापोलीत आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा येणार आहे. तसंच दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर आझाद मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी दौऱ्यावर येत असलेले आदित्य ठाकरे सामंत, कदम यांच्यावर काय बोलणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्याची तयारी सूर्यकांत दळवी यांच्याकडे आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT