दानवे-खोतकरांची दिलजमाई! अर्जुन खोतकर शिंदे गटात
२१ जूनला महाराष्ट्रात जे बंड झालं त्यानंतर शिवसेना रोज फुटते आहे. एकनाथ शिंदे यांच्या साथीला अनेक शिवसैनिक येत आहेत. एकानाथ शिंदे यांच्यासोबत आमदार, खासदार तर गेलेच आहेत आता शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेही […]
ADVERTISEMENT
२१ जूनला महाराष्ट्रात जे बंड झालं त्यानंतर शिवसेना रोज फुटते आहे. एकनाथ शिंदे यांच्या साथीला अनेक शिवसैनिक येत आहेत. एकानाथ शिंदे यांच्यासोबत आमदार, खासदार तर गेलेच आहेत आता शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेही उपस्थित होते. मागील आठवडाभरापासून अर्जुन खोतकर दिल्लीत आहेत. आज त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय.
ADVERTISEMENT
अर्जुन खोतकर म्हटले मी शिवसेना सोडलेली नाही
मी शिवसेना सोडली असं सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आहेत. पण असं कुठेही काही घडलं नाही. मी आजही शिवसेनेत आहे, मी शिवसैनिक आहे, आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. मी आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
या भेटीच्या वेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
हे वाचलं का?
२४ जूनला अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई
जून महिन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये भर पडली. ईडीने त्यांच्या जालना येथील साखर कारखान्याची जमीन, इमारत, प्लांट आणि यंत्रसामुग्री जप्त केली . जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी कारखान्याची जमीन, इमारत प्लांट हे सगळं जप्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती ईडीने दिली. त्यानंतर एक महिन्यातच अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाणं सूचक आहे ही चर्चाही रंगलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT