देशाच्या देवाचा अपमान झाला आहे तरी चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून बसलेत, अरविंद सावंत यांची टीका
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तसंच भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेवरून आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली जाते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आता यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, […]
ADVERTISEMENT
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तसंच भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेवरून आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली जाते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आता यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
ADVERTISEMENT
बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
काय म्हणाले आहेत अरविंद सावंत?
हे वाचलं का?
‘कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे, पण देशाच्या देवाचा अपमान होतो आणि कोणतीही कारवाई होत नाही. चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून गप्प बसतात. कानडी बांधव महाराष्ट्रातही आहेत. त्यांना इथे त्रास दिला जात नाही. शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही आता तुमच्या सरकारला सांगा नाहीतर तुमचं महाराष्ट्रात राहणं कठीण होईल’ असाही इशारा सावंत यांनी दिला आहे. एवढंच नाही तर आम्ही सत्व आणि तत्व सोडलेलं नाही. आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर यायला लावू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यानंतर सगळ्यांची बोबडी वळली आहे असाही टोला सावंत यांनी लगावला आहे.
पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. आधी बोम्मईंचा राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचं दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे घराघरातून पत्रं जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा अत्यंत संतापजनक घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरु मध्ये घडला. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमी देखील संतापलेत.
मागील अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून वारंवार केला जात होता. या सगळ्या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आता या प्रकरणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. तसंच आता भाजपचे नेते गप्प का बसलेत असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT