जे स्वतः स्टेबल नाहीत त्यांनी…गुलाबराव पाटलांनी डागली मनसेवर तोफ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गर्व से कहो हम हिंदू है अशी बॅनरबाजी करुन शिवसेनेला आव्हान देणाऱ्या मनसेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. जे स्वतःला स्टेबल नाहीत त्यांनी शिवसेनेला गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणू नये असं म्हणत गुलाबरावांनी मनसेला टोले लगावले आहेत. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

ADVERTISEMENT

मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला होता तेव्हा त्याने सुरुवातीला सर्वधर्म समभावाचा नारा आणला. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन आपण चालायचं असं त्यांचं म्हणणं होतं. यानंतर त्यांनी मराठीपणा आला. परप्रांतियांच्या कानफटात मारली, झेंडा बदलला. आज ते म्हणतायत की गर्व से कहो हम हिंदू है. आमचे बापजादे हे आधीपासूनच म्हणत होते. ही सर्व शिवसेनेचीच पिलावळ आहे. राजकारणात थारा नसल्यामुळे ही लोकं आता असा काहीतरी प्रयत्न करु पाहत आहेत.

‘गर्व से कहो हम हिंदू है’ : शिवसेना भवनाबाहेर ‘मनसे’चं पोस्टर

हे वाचलं का?

यावेळी जळगाव जिल्हा सहकारी बँक सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढवण्याबद्दलही गुलाबराव पाटलांनी भाष्य केलं. “जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत प्रयत्न सुरू आहेत. पण जर एकमत होत नसेल तर शिवसेनाच काय तर प्रत्येक पक्ष वेगळा लढेल. शिवसेनेची स्वबळाची तयारी आहे. बँक अ वर्गात ठेवायची असेल तर निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे, मी स्वतः ही निवडणूक लढणार नाहीये ना माझा मुलगा लढणार आहे. पण ही बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते”, त्यासाठी ही निवडणुक सर्वपक्षीयांनी मिळून बिनविरोध लढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही गुलाबराव म्हणाले.

“सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे रसायन शिवसेनेचं”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT