संजय राऊतांना मोठा धक्का; सावली सारखे सोबत असणारे भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात

मुंबई तक

नाशिक : काही दिवसांपूर्वीच १३ नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. बुधवारी किंवा गुरुवारी नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

नाशिक : काही दिवसांपूर्वीच १३ नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. बुधवारी किंवा गुरुवारी नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

संजय राऊतांसोबत सावली सारखे असायचे भाऊसाहेब चौधरी :

दरम्यान, भाऊसाहेब चौधरी यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय हा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांच्यासोबत सावली सारखे असायचे. चौधरी हे नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख असले तरीही ते मुळचे डोंबिवलीचे, मुंबईचे आहेत. त्यामुळे राऊत यांच्याशी त्यांचा जुना स्नेह आहे.

चौधरींच्या हकालपट्टीची स्वतः राऊतांनी दिली माहिती :

भाऊसाहेब चौधरी हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समजताच त्यांची शिवसेना (ठाकरे गट) नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याची माहिती स्वतः राऊत यांनी ट्विटर आणि फेसबुकवरुन दिली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच आदेशाने ही कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

समजवायला गेलेला नेताच शिंदे गटात :

शिवसेनेते फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार शिंदेंसोबत गेले. त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेतील आजी-माजी सदस्य, पक्षातील पदाधिकारीही शिंदे गटात गेले. मात्र त्यातुलनेत नाशिकमध्ये आमदार – खासदार सोडल्यास मोठ्या प्रमाणात पक्षात फूट पडली नव्हती.