Vidhan Sabha : केला तुका, झाला मका; बॉम्ब त्यांच्यात हातात फुटला ! १२ आमदारांच्या निलंबनावरुन राऊतांचा टोला

मुंबई तक

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा ठराव विधानसभेत मांडत असताना भाजपच्या आमदारांनी घातलेल्या राड्यामुळे पहिला दिवस गाजला. तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांना निलंबीत केलंय. या निलंबनावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटे काढले आहेत. “बारा आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा ठराव विधानसभेत मांडत असताना भाजपच्या आमदारांनी घातलेल्या राड्यामुळे पहिला दिवस गाजला. तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांना निलंबीत केलंय. या निलंबनावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटे काढले आहेत.

“बारा आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, हे आम्ही पाहतोय; आम्ही त्या सभागृहात नव्हतो. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. यांची अशी भूमिका आहे की, त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले.” संजय राऊत प्रसारमाध्यमांशी मुंबईत बोलत होते.

Cabinet Expansion : नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान? दिल्लीला ताबडतोक येण्याचे आदेश

भाजप आमदारांना विधानसभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काल विरोधकांनी केला होता. यावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “मला असं वाटत नाही, सभागृह विचार मांडण्यासाठीच असतं. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण कोकणात एक म्हण आहे, ‘केले तुका, झाले माका’; बॉम्ब त्यांच्या हातातच होता. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण एक चूक किती महागात पडू शकते. बेशिस्त वर्तन महाराष्ट्राच्या विधानसभेत चालत नाही.”

“बारा आमदारांचं निलंबन हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, अशाने सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळेला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल”, असंही राऊत यांनी म्हटलं.

Vidhan Sabha Live : फडणवीस आणि त्यांची टोळी वैफल्यग्रस्ततेचं दर्शन घडवत आहे – शिवसेना आमदाराची टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp