किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा, दहशतवाद्यांचे कागद त्यांना देऊ – राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा
काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा हैदोस पुन्हा एकदा सुरु झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे बिहारवरुन आलेल्या कामगारांना अतिरेकी आपलं टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. ३७० कलम हटवल्यानंतरही काश्मीरमधली परिस्थिती सुधारत नसल्यामुळे आज शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत अतिरेक्यांनी ११ नागरिकांना ठार केलं आहे. “काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा वाढला आहे. […]
ADVERTISEMENT
काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा हैदोस पुन्हा एकदा सुरु झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे बिहारवरुन आलेल्या कामगारांना अतिरेकी आपलं टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. ३७० कलम हटवल्यानंतरही काश्मीरमधली परिस्थिती सुधारत नसल्यामुळे आज शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत अतिरेक्यांनी ११ नागरिकांना ठार केलं आहे. “काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा वाढला आहे. ३७० कलम हटवूनही परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही. त्या ठिकाणी शीख, काश्मिरी पंडीत, बिहारी लोकांच्या हत्या होत आहेत. ही जबाबदारी केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाची आहे. पाकिस्तानच्या बाबतीत धमक्यांची भाषा बोलून हे थांबणार नाही, सर्जिकल स्ट्राईकनेही हे थांबणार नाही. तिकडे चीननेही घुसखोरी केली आहे, त्यांच्यावरही सर्जिकल स्ट्राईक व्हायला पाहिजे.”
महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रंणांच्या धाडी सुरु आहेत याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले. “ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा. खूप शक्तिशाली लोक आहेत दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत. किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ.”
हे वाचलं का?
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरही राऊत यांनी भाष्य केलं. पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊद्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मिरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही. पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध नकोत ही आमची आधीपासूनची भूमिका आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचं की नाही याने काश्मीरचा प्रश्न सुटणार नाहीये, असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT