सरवणकर पिता-पुत्र चर्चेत : मुलाकडून म्यावं – म्यावंच्या घोषणा तर वडील मनसेच्या मंचावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आमदार सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा, माजी नगरसेवक समाधान सरवणकर चांगलेच चर्चेत राहिले. काल प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिक समोरासमोर आले, त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. या घोषणेवेळी समाधान सरवणकर म्यांव म्यांवच्या घोषणा देताना दिसले. त्यानंतर आमदार सदा सरवणकर थेट मनसेच्या स्टेजवर दिसले.

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं?

प्रभादेवी परिसरात रात्री उशिरा शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. समाधान सरवणकर आणि संजय भगत यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. त्यावेळी समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव..म्याव अशा घोषणा देताना दिसून आले. त्यानंतर मात्र, दोन्ही गटात घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

पुणे : विसर्जन मिरवणुकीत पोलिस आयुक्त गुप्ता संतापले; भाजपचे माजी नगरसेवक पोटेंसह वाद

हे वाचलं का?

याबाबत बोलताना समाधान सरवणकर म्हणाले, मिरवणुक सुरळित सुरु असताना उद्धव गटाने काही विघ्न संतोषी लोकांना वरळी, धारावी इथून आणून बसवले होते. काही तरी वातावरण खराब व्हावे हा त्यांचा उद्देश होता. तसेच आम्ही घोषणा दिल्या नसल्याचे ते म्हणाले. आम्ही प्रभादेवीच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये होतो, त्यावेळी महिलांबाबत काही अक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. मात्र आम्ही इकडे आल्यानंतर ते पळून गेले. आम्ही असतो तर त्यांच्या कानाखाली लावली असती.

कोल्हापूर : डॉल्बीवरुन पोलिसांचे नियमावर बोट; कार्यकर्त्यांचा रात्रभर रस्त्यावर मुक्काम

ADVERTISEMENT

सदा सरवणकर थेट मनसेच्या मंचावर :

या दरम्यान आणखी एक चमत्कारिक चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेला डिवचण्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावर दिसले. काल सदा सरवणकर मनसे नेते संतोष धुरी यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिंदे गट आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT