साताऱ्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, शंभुराज देसाईंचा राष्ट्रवादीला इशारा
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हात मिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकात शिवसेना स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन […]
ADVERTISEMENT

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हात मिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकात शिवसेना स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा बँक निवडणूक : रांजणे छोटे कार्यकर्ते, बोलवता धनी वेगळा – शशिकांत शिंदेंची टीका
महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी आज शासकिय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार महेश शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत जाधव, नंदकुमार घाडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.