धक्कादायक! न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सहज एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो.पण याच सोशल मीडियाचे जेवढे फायदे तेवढेच तोटे देखील आहेत.ते कधी आर्थिक,तर कधी ते जीवावर देखील बेतले आहेत. आता अशीच एक घटना पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. प्रीत यादव या तरुणी सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर […]
ADVERTISEMENT

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सहज एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो.पण याच सोशल मीडियाचे जेवढे फायदे तेवढेच तोटे देखील आहेत.ते कधी आर्थिक,तर कधी ते जीवावर देखील बेतले आहेत. आता अशीच एक घटना पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. प्रीत यादव या तरुणी सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. यानंतर त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली.या सततच्या त्रासाला कंटाळून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शंतनू वाडकर या तरूणाची आत्महत्या
शंतनू वाडकर वय (19 रा. अनंत कुमार सोसायटी दत्तवाडी) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा १९ वर्षीय तरुण राहण्यास होता. तो सोशल मीडिया सक्रिय असायचा.
शंतनू आणि तरूणीची ओळख कशी झाली?