स्मृती इराणींना विमानातच महागाईवरून केला सवाल; काँग्रेस नेत्या काय म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईवरून आंदोलन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा एक व्हिडीओ आज व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या एका महिला नेत्याने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, काँग्रेसच्या नेत्याने थेट विमानातच महागाईवरून प्रश्न विचारला.

ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या असून, वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत आहेत. वाढत्या महागाईवरूनच भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या महिला नेत्याने थेट विमानातच प्रश्न विचारला.

ही घटना घडला दिल्ली-गुवाहाटी विमान प्रवासात. या विमानातून स्मृती इराणी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नेत्या नेत्ता डिसुझा प्रवास करत होत्या. प्रवास करत असताना दोन्ही महिला नेत्या आमने-सामने आल्या. यावेळी डिसुझा यांनी स्वयंपाकाच्या महागलेल्या गॅसवरून इराणींना प्रश्न विचारला. हा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

हे वाचलं का?

हा व्हिडीओ १ मिनिटं आणि ११ सेंकदांचा असून, यात काँग्रेस नेत्या नेत्ता डिसुझा या स्मृती इराणींना प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र, स्मृती इराणी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळताना दिसत आहे. स्मृती इराणी डिसुझांना म्हणाल्या, ‘आपण आधी लोकांना उतरण्यासाठी रस्ता द्या. यामुळे लोकांना त्रास होतोय.’

त्यावर डिसुझा म्हणाल्या की, ‘हा लोकांचाच प्रश्न आहे.’ विमानात एक महिला प्रवासी इराणींना हॅप्पी बिहू म्हणत शुभेच्छा देते. त्यावर इराणीही उत्तर देतात. हाच मुद्दा पकडत डिसुझा इराणींना म्हणाल्या, ‘हॅप्पी बिहू गॅस शिवाय…, स्टोव्ह शिवाय…?’ यावर इराणी म्हणाल्या की, ‘तुम्ही खोटं बोलत आहात. चुकीचं बोलत आहात.’

ADVERTISEMENT

डिसुझा शुटिंग करत असल्याचं बघून स्मृती इराणीही मोबाईल काढून शुटिंग करत असल्याचं दिसत आहे. इराणींनी यावरूनही काँग्रेस नेत्यावर आरोप करताना दिसत आहे. डिसुझांनी त्यांच्या परवानगीशिवाय रेकॉर्डिंग करत आहे. त्यावर डिसुझा इराणींना म्हणतात, ‘तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात आणि लोकांना तुमच्याकडून उत्तर हवंय.’ त्याचवेळी इराणी म्हणतात की, कोरोना काळात लोकांना मोफत लस दिली गेली.’ दोन्ही नेत्यांमधील हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT