Solapur : शाळा सुरू झाल्यापासून 10 दिवसात 613 विद्यार्थी Corona पॉझिटिव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात 613 मुलं कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये करोना होण्याचे प्रमाण प्रकर्षांने दिसू लागले आहे. जिल्ह्य़ात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 18 वर्षांखालील सुमारे 12 हजार मुलांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र यामध्ये अलिकडच्या काही दिवसांत वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे. यात अगदी गेल्या दहा दिवसांत तब्बल 613 मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये विशेषत: बाधितांचे प्रमाण मोठे आहे. मात्र या वयोगटातील लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढलेले दिसत असले, तरी या मुलांमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

शहर व जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या सव्वा वर्षांत आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक 11 हजार 886 मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात 6773 मुले तर 5113 मुलींचा समावेश आहे. या दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ातील वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

दहा लाख मुलांची तपासणी: जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 18 वर्षांखालील सुमारे 10 लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली. 60 पेक्षा अधिक मुले करोनाबाधित दिसून आली होती. याशिवाय सुमारे पाचशे मुलांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळून आली.

आजच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळमध्ये वाढणारे रूग्ण ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं म्हटलं आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात सध्या लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. सोलापूरमध्ये दहा दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. अनेक गावांमध्ये जवळपास दीड वर्षाने शाळेची घंटा ऐकू गेली होती. आता अशात मागील दहा दिवसांमध्ये 613 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT