सोलापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँटे की टक्कर? शरद पवारांनी एकाच वाक्यात दिले आव्हान
मुंबई : सोलापुरच्या राजकारणात 2024 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार का असा सवाल सध्या विचारला जात आहे. त्याचे कारण ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरमधील एक मोठे वक्तव्य आणि त्या एका वक्तव्यातून भाजपला अप्रत्यक्षपणे दिलेले आव्हान. नेमकं काय घडलं? सोलापूर हा एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. कधीकाळी जिल्ह्यातील […]
ADVERTISEMENT
मुंबई : सोलापुरच्या राजकारणात 2024 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार का असा सवाल सध्या विचारला जात आहे. त्याचे कारण ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरमधील एक मोठे वक्तव्य आणि त्या एका वक्तव्यातून भाजपला अप्रत्यक्षपणे दिलेले आव्हान.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
सोलापूर हा एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. कधीकाळी जिल्ह्यातील जवळपास आठ आमदार राष्ट्रवादीचे होते. शिवाय आधी स्वतः शरद पवार आणि नंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने जिल्ह्यातील माढ्याचा खासदारही राष्ट्रवादीचाच होता. मात्र आज परिस्थिती बदलली असून सोलापुरमधील आठ आमदार भाजप-शिवसेना युतीचे आणि जिल्ह्यातील दोन्ही खासदारही भाजपचेच आहेत.
त्यामुळे एकेकाळी राष्ट्रावादीचा जो गड होता तो गड आता भाजपने खेचून घेतला आहे. नेमके याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता? आणि 2024 ला राष्ट्रवादीची सोलापूर जिल्ह्यात काय रणनीती असणार, असे सवाल मुंबई तकचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी केले.
हे वाचलं का?
त्यावर शरद पवार यांनी, “निवडणूक झाल्यावर निकाल बघून तुम्हीच सांगा मला”, असे म्हणतं त्यांनी एकाच वाक्यात भाजपला आव्हान दिले. एकीकडे शिंदे-ठाकरेंचा खऱ्या शिवसेनेवरुन वाद सुरु आहे. दुसरीकडे विरोधकांकडून नव्याने विधानसभेच्या निवडणूक घ्या, असे चॅलेंज दिले जाते आहे. असे असतानाच शरद पवारांनी निवडणूक निकालांचं गणित मांडून, येत्या काळात सोलापुरात भाजपसमोर राष्ट्रवादीचं चॅलेंज असणार, असाच मेसेज दिला असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT