‘फटाके विकले.. चिकन, मटणचा पण बिझनेस केला..’, राणेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Narayan Rane addressed young entrepreneurs : लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड घ्या प्रगती नक्की होईल. आणि प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी तरूण उद्योजकांना दिला.
ADVERTISEMENT
Narayan Rane addressed young entrepreneurs : लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड घ्या प्रगती नक्की होईल. आणि प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी तरूण उद्योजकांना दिला. नारायण राणे लोणावळ्या आयोजित केलेल्या कोळी महासंघाच्या स्वयंरोजगार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात नारायण राणे यांनी त्याच्या करीअरमधले अनेक चढ-उतार आणि किस्से सांगितले. (sold firecrackers..also did business of chicken, mutton union minister narayan rane told an amazing story of life)
ADVERTISEMENT
मुंबईत अनेक कामे केली, ग्रेड वन हॉटेल, गॅरेज, टॅक्सी-टेम्पो चालवला. मराठी माणूस जे व्यवसाय करत नाही असा मटणाचा व्यवसाय देखील केला. आजही आहे पण आता भावांना देऊन टाकला असल्याची आठवण नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितली. तसेच लाज लज्जा बाळगून चालत नाही, मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड घ्या प्रगती नक्की होईल. आणि व्यवसायानेच प्रगती होते मात्र शिक्षण ही गरजेचे असल्यास त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : शरद पवारांची अदाणींसाठी बॅटिंग, राहुल गांधींचंही प्रत्युतर… पण वेगळ्याच स्टाइलमध्ये!
नारायण राणे (Narayan Rane) यांना सरकारी नोकरी करत असल्याचा किस्साही सांगितला. मी पण इन्कम टॅक्समध्ये 13 वर्ष नोकरी केली. सरकारी पगार किती तुम्हाला माहितीचं. कधी कधी घरी जायपर्यंत मित्र भेटले की पार्टी झाली, तर तो पगारही संपून जायचा असा किस्सा सांगताच एकच हशा पिकला.
हे वाचलं का?
सध्या उद्योजक गौतम अदाणींवर बरंच राजकारण सुरू आहे. मात्र, उद्योजक होणं किती महत्त्वाचं आहे हे राणेंनी पटवून दिलं. अशाच स्वरुपाचं भाष्य काल (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. पाहा व्यवसाय आणि गौतम अदाणींविषयी ते नेमकं काय म्हणाले होते.
हे ही वाचा : Ajit Pawar: नॉट रिचेबल असलेले अजितदादा नेमके होते तरी कुठे?; म्हणाले, पित्त…
शरद पवार काय म्हणाले?
“आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानींनी योगदान दिले आहे, देशाला त्याची गरज नाही का? विजेच्या क्षेत्रात अदाणी यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. देशाला विजेची गरज नाही का? जबाबदारी स्वीकारून देशाचे नाव उंचावणारे हे लोक आहेत.या उद्योगपतींनी चूक केली असेल, तर तुम्ही हल्ला करा, पण त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही,असे मत शरद पवार (Sharad pawar) यांनी मांडले होते.
ADVERTISEMENT
तसेच विविध दृष्टिकोन असू शकतात, टीका होऊ शकते. सरकारच्या धोरणांवर ठामपणे बोलण्याचा अधिकार आहे, पण चर्चाही व्हायला हवी. कोणत्याही लोकशाहीत चर्चा आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो, चर्चा आणि संवादाकडे दुर्लक्ष केल्यास व्यवस्था धोक्यात येईल, ती नष्ट होईल. आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत. हे आपण समजून घेतले पाहिजे,असे शरद पवार (Sharad pawar) मुलाखतीत म्हणाले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अदाणींची पाठराखण करताच गदारोळ, शरद पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT