राज्य सरकारमधल्या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे OBC आरक्षण रखडलं-बावनकुळेंचा आरोप
राज्य सरकारमधल्या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे ओबीसी आरक्षण रखडलं असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. माजी उर्जा मंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत असले तरी कुणीतरी त्यांच्या सरकारमधील झारीतील शुक्राचार्य या आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.तसंच त्या झारीतील शुक्राचार्याला विजय वडेट्टीवार यांनी शोधून काढावं असा आवाहन […]
ADVERTISEMENT
राज्य सरकारमधल्या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे ओबीसी आरक्षण रखडलं असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. माजी उर्जा मंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत असले तरी कुणीतरी त्यांच्या सरकारमधील झारीतील शुक्राचार्य या आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.तसंच त्या झारीतील शुक्राचार्याला विजय वडेट्टीवार यांनी शोधून काढावं असा आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेली भूमिका त्यांची आहे. त्यांना शुक्राचार्य कोण दिसलं असावं.मी जरा तपासून बघतो.मला असं वाटतं की हे आरक्षण टिकण्यासाठी सर्व पक्षांची भूमिका एक सुराची एक मताची आहे.या आरक्षणाच्या बाबतीत शुक्राचार्य शोधाचे झालेच तर दिल्लीपासून महाराष्ट्र पर्यंत शोधावे लागतील.असा पलटवार मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला आहे.
आणखी काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
हे वाचलं का?
ओबीसी समाजातून कोणीही आरक्षण मागू नये प्रस्थापितांनी ही आमची प्रमुख मागणी असल्याचे मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापुरात आयोजित ओबीसी व्हीजेएनटी च्या निर्धार मेळाव्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. ओबीसी समाजाच्या 375 जाती असून त्या जातींनाच आत्ता पुरेसे आरक्षण नाही.यात प्रस्थापित जाती आल्या तर आपण येथे कोण टिकणार ? हा उपेक्षित समाज आहे.ज्याच्या घरांमध्ये अद्याप लाईट पोहोचली नाही. त्याच्या घरामध्ये एकही माणूस नोकरीला लागला नाही.त्याला न्याय मिळणार का ? असा प्रश्न मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
कोरोनाबाबत काय म्हणाले वडेट्टीवार?
ADVERTISEMENT
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन भविष्यात राज्याच्या सीमा चेकपोस्ट लावून सील कराव्या लागतील किंवा निर्बध कडक करावे लागतील असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.नाईट कर्फ्यू लावण्याचा अजून तरी विचार नाही मात्र सध्या करुणा चा आकडा वाढत आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना प्रवेश देताना नवीन निर्बंध लावून RTPCR कंपल्सरी करण्याची गरज आहे. इतर राज्यातील विमानाने प्रवास करणारे किंवा वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी निर्बंध लावण्याची गरज आहे. भविष्यात जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सीमा भविष्यात चेकपोस्ट लावून सेल कराव्या लागतील असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT