राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातल्या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहून सूचना केल्या आहेत. पण राज्यपालांच्या या पत्रामुळे त्यांच्याच आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातल्या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहून सूचना केल्या आहेत. पण राज्यपालांच्या या पत्रामुळे त्यांच्याच आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेणार? अशी विचारणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिकामं आहे. पटोले यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला कार्यभार दिला.
विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडा, अशा सूचना राज्यपालांनी केल्या आहेत. पण कायदेशीर प्रक्रियेनुसार, राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालांना कळवली जाते आणि त्यानुसार राज्यपाल हे विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या सूचना करतात. पण सध्याच्या परिस्थितीत राज्यपालांनी राज्य सरकारकडून पत्र मिळण्याआधीच विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी स्वतःहूनच पुढाकार घेतल्याचं दिसतं आहे.
ही बातमी देखील पाहा: ‘राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जातंय’