ड्रग्ज केस: नवाब मलिकांच्या जावयाला न्यायालयाकडून मोठा दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाला अट करण्यात आली होती. समीर खान यांना आता कोर्टाने दिलासा दिला आहे. कारण विशेष NDPS कोर्टाने समीर खान यांना जामीन मंजूर केला आहे. जानेवारी महिन्यात समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि NRI करण सजनानी अशा तिघांना अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

एनसीबीने शनिवारी करण सजनानी या ब्रिटीश अनिवासी भारतीयासह राहिला व शाईस्ता फर्निचरवाला, या दलाल बहिणींना अटक केली होती. या तिघांकडेही गांजासह अन्य अमली पदार्थ सापडले होते. त्याखेरीज करण सजनानी हा अमेरिका व लंडनहून अमली पदार्थांच्या तस्करीतदेखील सहभागी असल्याचे तपासात समोर आले. या तिघांच्या चौकशीतूनच ‘मुच्छड पानवाला’चे सह मालक रामकुमार तिवारी यांना अटक करण्यात आली.

यासंबंधी अधिक तपास केल्यानंतर समीर खान यांचे नाव समोर आले आहे.‘सजनानीसह अन्य तिघांच्या चौकशीत समीर खान यांचे नाव समोर आले. यामुळे समीर खान यांना चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे’, असे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांनी जानेवारी महिन्यात काय म्हटलं होतं?

जावई समीर खान यांच्या अटकेनंतर 14 जानेवारीला नवाब मलिक यांनी ट्विट केलं होतं. त्यात मलिक असं म्हणाले होते की कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही आणि कोणत्याही भेदभावाशिवाय तो लागू केला पाहिजे. न्यायव्यस्थेविषयी मला आदर आहे आणि विश्वासही आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT