सावत्र बापाचा आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अपहरण झाल्याची खोटी तक्रारही दाखल
अकोल्याच्या अकोट शहरात राहणाऱ्या सावत्र बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकच नव्हे तर मुलगी गरोदर राहिल्याचं लक्षात येताच या बापाने पोलिसांत जाऊन आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची खोटी तक्रारही दिली. परंतू खरा प्रकार समोर येताच पोलिसांनी बापाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अमरावतीला रहायची. आरोपी बापाने […]
ADVERTISEMENT
अकोल्याच्या अकोट शहरात राहणाऱ्या सावत्र बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकच नव्हे तर मुलगी गरोदर राहिल्याचं लक्षात येताच या बापाने पोलिसांत जाऊन आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची खोटी तक्रारही दिली. परंतू खरा प्रकार समोर येताच पोलिसांनी बापाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अमरावतीला रहायची. आरोपी बापाने मुलीला घरी बोलावून घेतलं. यानंतर आरोपी बाप वारंवार आपल्या मुलीवर बळजबरी करायचा. अनेकदा बापाने आपल्या मुलीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. मुलगी गरोदर राहिल्याचं लक्षात येताच आरोपी बापाने अकोट पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची खोटी तक्रार १८ जानेवारीला दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन तपासाला सुरुवातही केली.
धक्कादायक ! पतीला डांबून गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपीची धिंड
हे वाचलं का?
दुसरीकडे पीडित मुलीने संधी साधून आपल्या आईला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर आईने मुलीसह २० जानेवारीला अकोट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी सावत्र बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या महिलेचे दागिने लुटले, दोघांनी केला बलात्कार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT