Jalna Violence: गावातील कमानीला नाव देण्याच्या वादातून तुफान राडा, पोलिसांचा हवेत गोळीबार
इसरार चिश्ती, जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तर जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात […]
ADVERTISEMENT
इसरार चिश्ती, जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तर जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावच्या सरपंच आणि उपसरपंचासह 20 ते 25 जणांना अटक केलं आहे. दरम्यान, गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अनधिकृतपणे उभारलेला पुतळा हटवला असून कमान देखील काढण्यात येणार आहे.
या प्रकरणी प्रभारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बोलताना गावात तणाव पूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
पोलिसांवरही हल्ला, धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
गावच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटात झालेल्या राड्यावरून गावात एकच हिंसाचार उसळला. त्याचवेळी गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर देखील जमावाने दगडफेक करुन पोलिसांना जखमी केले. याच प्रकरणी आता पोलिसांनी 250 जणा विरुद्ध 307, 353, कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
याशिवाय 12 जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखून दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडून आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 50 जणांविरुद्ध रस्त्यात टायर पेटून आग लावल्याप्रकरणी व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
अमरावती: झेंडा काढल्याच्या वादावरुन दोन गटात तुफान दगडफेक, संचारबंदी लागू
काल झालेल्या या दगड दगडफेकीत पोलीस कर्मचारी रवी आव्हाड यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबारात देखील केला. या सगळ्यात दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. अशावेळी आता राज्य शासन या सगळ्या प्रकरणात दंगलखोरांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमरावतीतही झेंडा काढल्याच्या वादावरुन झालेली तुफान दगडफेक
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात 17 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील एक झेंडा काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला होता.
यानंतर पोलिसांनी अचलपूर आणि परतवाडा येथील बंदोबस्त देखील वाढवला होता. अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली होती. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT