अरे बापरे! नऊ बकऱ्या गिळणाऱ्या अजगराला जेरबंद करण्यात यश
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुर तालुक्यातील उचली गावातील 9 बकऱ्या फस्त करणाऱ्या 12 फुटांच्या अजगराला पकडण्यात यश आले आहे. मागच्या वर्षांपासून या अजगराची परिसरात दहशर होती. अर्थ कंजर्वेशन ऑर्गनाइज़ेशनच्या सदस्यांनी या अजगराला पकडलं आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतात अजगर आढळतात. मात्र या अजगराची चांगली दहशत होती. कारण या विशालकाय अजगराने गावातील 9 बकऱ्यांचा शिकार केला होता. […]
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुर तालुक्यातील उचली गावातील 9 बकऱ्या फस्त करणाऱ्या 12 फुटांच्या अजगराला पकडण्यात यश आले आहे. मागच्या वर्षांपासून या अजगराची परिसरात दहशर होती. अर्थ कंजर्वेशन ऑर्गनाइज़ेशनच्या सदस्यांनी या अजगराला पकडलं आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतात अजगर आढळतात. मात्र या अजगराची चांगली दहशत होती. कारण या विशालकाय अजगराने गावातील 9 बकऱ्यांचा शिकार केला होता. म्हणून वर्षभरापासून त्याचा शोध सुरु होता. अखेर त्याला पकडण्यात यश आले आहे.
ADVERTISEMENT
गेल्या वर्षभरापासून होती अजगराची दहशत
गेल्या वर्षभरापासून हा अजगर शेतकऱ्यांना दिसत होता. हा अजगर इतका मोठा होता की, त्याला पाहून भलेभले गार व्हायचे. गावकऱ्यांनी सांगितलं, यापूर्वी आम्ही इतका महाकाय अजगर कधी पहिला नाही. त्यामुळे लोकांना शेतात जायला देखील भीती वाटायची. अनेक शेतकरी रात्रीच शेतात जाण्यास टाळायचे. तर लहान मुलांना त्या परिसरात जाण्यास मनाई होती. कारण गेल्या वर्षभरातून या अजगराने 9 बकऱ्यांचा फडशा पाडला होता. म्हणून या अजगराला पकडायची मोहीम युद्धपातळीवर सुरु केली गेली.
हे वाचलं का?
अजगराला पकडण्यात यश
या अजगराची माहिती सार्थ कंजर्वेशन ऑर्गनाइज़ेशनच्या सदस्यांना देण्यात आली. सर्पमित्र ललित उरकुड़े, विवेक राखडे, चेतन राखडे तथा ईशान वठे यांनी घटनास्थळी दाखल होऊन भेट दिली. मोठ्या मेहनतीनंतर महाकाय 12 फुटांच्या अजगराला पकडण्यात त्यांना यश आले. अजगर पकडल्यानंतर या गावातील लोकांना खूप आनंद झाला. मागच्या वर्षभरापासून दहशतीखाली असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास घेतला. कारण या अजगरामुळे गावातील नागरिकांना भीतीचा सामना करावा लागत होता. कधी हा अजगर आपल्याला शिकार बनवेल याची भीती गावकऱ्यांमध्ये होती. म्हणून अजगर पकडल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
ADVERTISEMENT
अजगराला सुरक्षितस्थळी सोडलं
ADVERTISEMENT
गावाजवळील शेतात मागच्या वर्षभरापासून अजगराची भीती दहशत होती. आतापर्यंत या अजगराने 9 शेळ्यांना आपले शिकार केले होते. मात्र आता अजगर पकडल्याने आम्हाला समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस पाटील संघर्ष झगजापे यांनी दिली. सर्पमित्र संघटनेने या अजगराला पकडून दूर जंगलात सुरक्षितस्थळी सोडलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT