लेकीसारखीच आई! सुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रतिभा पवार यांनीही गाडीतून उतरुन दूर केलं ट्राफिक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : दोन दिवसांपूर्वीच बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हडपसर ते सासवड पालखी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी स्वतः खाली उतरुन वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ आता त्यांच्या आई आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाही अशाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यातून सावरण्यासाठी लेकीप्रमाणेच त्यांनीही गाडीतून खाली उतरत वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

रविवारी सकाळी बारामती शहरातून प्रशासन भवन मार्गे कसब्याकडे निघालेल्या प्रतिभा पवार यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. दहा ते पंधरा मिनिटे वाट बघूनही वाहतूक कोंडी दूर होत नसल्याचे पाहून प्रतिभा पवार स्वतः गाडीतून खाली उतरल्या आणि रस्त्यावर जाऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहनचालकांना त्यांनी सूचना दिल्या. प्रतिभा पवार यांना वाहतूक कोंडी दूर करताना पाहून बारामती शहर पोलीस ठाण्यात फोन झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून येथील वाहतूक कोंडी दूर केली.

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे याही वाहतूक कोंडी दूर करताना दिसून आल्या होत्या. सुप्रिया सुळे गुरुवारी बारामतीमधून सासवडमार्गे पुण्याला येत होत्या. पण पुणे-सोलापूर रस्त्यावरुन प्रवास करत असताना त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. बऱ्याच वेळानंतर वाहने पुढे सरकत नसल्यामुळे अखेर त्या खाली उतरल्या आणि त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर असलेल्या वाहतूककोंडीत त्यांची गाडी अडकली होती. त्यांना पुण्यातील बैठकीला उपस्थित राहायचे होते.

हे वाचलं का?

याबाबत खासदार सुळे यांनी ट्विट करुन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य वेधलं होतं. हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते, याचा नागरीकांना प्रचंड त्रास व मनस्ताप होत आहे. “केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे.कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा,” असे सुळे यांनी म्हंटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT