Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन
सचिन वाझे यांनीच माझे पती मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय मला आहे असा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी त्यांच्या कबुली जबाबात केला आहे. आज याच प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विमला हिरेन यांच्या जबाबाचा काही भाग विधानसभेत वाचून दाखवला. ज्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झालेली […]
ADVERTISEMENT

सचिन वाझे यांनीच माझे पती मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय मला आहे असा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी त्यांच्या कबुली जबाबात केला आहे. आज याच प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विमला हिरेन यांच्या जबाबाचा काही भाग विधानसभेत वाचून दाखवला. ज्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झालेली पाहण्यास मिळाली. पाचवेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. विमला मनसुख हिरेन यांचा संपूर्ण जबाब काय आहे वाचा..
माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती आहे.
विमला हिरेन यांच्या जबाबातील ठळक बाब
काय आहे विमला हिरेन यांचा जबाब?