अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यूने पुणे हादरलं, चेहऱ्यावर गंभीर जखमा
Bhagyaashreee Mote पुणे: देवयानी फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Actress Bhagyashree Mote) हिच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं असून याप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचं नाव मधू मार्कंडे असं असून ती विवाहित होती. मिळालेल्या माहितीनुसार, मधूच्या चेहऱ्यावर काही गंभीर अशा जखमा आढळून आल्या आहेत. य़ा […]
ADVERTISEMENT
Bhagyaashreee Mote पुणे: देवयानी फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Actress Bhagyashree Mote) हिच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं असून याप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचं नाव मधू मार्कंडे असं असून ती विवाहित होती. मिळालेल्या माहितीनुसार, मधूच्या चेहऱ्यावर काही गंभीर अशा जखमा आढळून आल्या आहेत. य़ा घटनेमुळे भाग्यश्री मोटेसोबतच तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. (suspicious death of actress bhagyashree motes elder sister pune with severe facial injuries)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, मधू मार्कंडे आणि भाग्यश्री मोटे या बहिणी आहेत. मधू ही वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करायची. ज्यामध्ये तिला तिची मैत्रीण मदत करायची. आपल्या व्यवसायासाठी मधूला एका खोली भाड्याने हवी होती. त्यामुळे रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसह वाकड परिसरात फिरत होती.
दरम्यान, रूम बघून झाल्यानंतर अचानक मधूला चक्कर आली आणि तिची दातखिळी बसली. त्यामुले तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणीने तिला ताबडतोब नजीकच्या खासगी रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचार होऊ न शकल्याने मधूला महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मधूला तपासल्यानंतर ती मृत असल्याचं घोषित केलं.
हे वाचलं का?
मात्र, मधूचा मृत्यू हा काही नैसर्गिकरित्या झालेला नसून त्यामागे घातापातची शक्यता तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मधूच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारच्या जखमा आहेत ते पाहता तिचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, मधूच्या नातेवाईकांनी मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केल्यानंतर आता या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
अभिनेत्री भाग्यश्री मोटे ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर; थुकरटवारीत ‘एकदम कडक’ चे प्रमोशन
ADVERTISEMENT
दरम्यान, बहिणीच्या मृत्यूचा भाग्यश्रीला प्रचंड धक्का बसला आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर बहिणीसोबतचे फोटो शेअर करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
ADVERTISEMENT
यावेळी एक फोटो शेअर करून भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, ‘माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला! माझी आई, बहीण, मित्र, विश्वासू आणि आणखी काय-काय होतीस तू माझ्यासाठी? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू होती. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू? तू मला ते कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. कधीच नाही.. कधीच नाही’
बिकीनीमध्ये बोल्ड दिसणाऱ्या भाग्यश्री मोटेचा पंजाबी ड्रेसमधील सोज्वळ लूक
‘तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल.’
‘तू नाहीयेस?’ असं भाग्यश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटलं आहे.
कोण आहे भाग्यश्री मोटे?
अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फॉलोईंग देखील आहे. तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी ती बरीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक बोल्ड फोटोही शेअर करते.
भाग्यश्रीने सुरुवातीला छोट्या पडद्यावरील देवश्री गणेश या मालिकेत तिने देवी पार्वतीची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर ती इतरही काही टीव्ही मालिकांमध्येही दिसून आली होती. छोट्या पडद्यानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळाली. तिने शोधू कुठे, एकदम कडक, काय रे रास्कला यासारख्या सिनेमांमधून देखील काम केलं आहे. याशिवाय तिने काही तेलुगू सिनेमातही काम केलं आहे.
भाग्यश्री मोटेच्या जीन्स अन् कट टॉपमधील हॉट पोझ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT