सुझान खान म्हणते, आर्यन चांगला मुलगा, फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला!
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहे. याच प्रकरणी कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. आता सुझान खान हिने देखील किंग खानला पाठिंबा दिला […]
ADVERTISEMENT

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहे. याच प्रकरणी कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. आता सुझान खान हिने देखील किंग खानला पाठिंबा दिला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये आर्यनला एक चांगला मुलगा म्हटलं आहे.
सुझान खानचं नेमकं ट्विट काय ?
सुझान खानने शाहरुख खान आणि गौरी खानला पाठिंबा दिला आहे. त्याच्या समर्थनार्थ, सुझानने ट्विट केलं आहे. ज्यात ती म्हणते, ‘मला वाटते की हे आर्यन खानबद्दल नाही. कारण तो दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. या परिस्थितीकडे एक उदाहरण म्हणून पाहिल्यास आपल्याला दिसून येईल की बॉलिवूडच्या लोकांचं ‘विच हंट’ कसे केले जाते. हे दु:खद आणि अन्यायकारक आहे. कारण तो एक चांगला मुलगा आहे. मी शाहरुख आणि गौरी यांच्या पाठिशी आहे.’
दुसरीकडे, शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जवळचे आणि मित्र हे मन्नतवर येत आहेत. हे सर्व जण या कठीण परिस्थितीत खान कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सलमान खान हा पहिल्यांदा शाहरुखच्या घरी जाणारा बॉलिवूडमधील अभिनेता होता. ज्या दिवशी आर्यन खानला अटक करण्यात आली त्याच दिवशी रात्री सलमान खान मन्नतवर गेला होता. सलमान खान व्यतिरिक्त सीमा खान, महिप कपूर, अलविरा अग्निहोत्रीसह अनेक सेलिब्रिटी हे मन्नतवर गेले होते.