T-Series चे MD भुषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
टी-सिरीज म्युझिक कंपनीचे एमडी भुषण कुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचं सांगत भुषण कुमार यांनी आपला फायदा उचलल्याचा आरोप या मॉडेलने केलाय. डी.एन.नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. पीडित मॉडेलने ३ ठिकाणी आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचं म्हटलंय. २०१७ सालापासून भुषण कुमार […]
ADVERTISEMENT
टी-सिरीज म्युझिक कंपनीचे एमडी भुषण कुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचं सांगत भुषण कुमार यांनी आपला फायदा उचलल्याचा आरोप या मॉडेलने केलाय. डी.एन.नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
पीडित मॉडेलने ३ ठिकाणी आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचं म्हटलंय. २०१७ सालापासून भुषण कुमार यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम देतो असं सांगून भुषण कुमार ३ वर्ष आपल्यावर हा अत्याचार करत असल्याची तक्रार या मॉडेलने दाखल केली आहे. भुषण कुमार यांनी आपले आक्षेपार्ह स्थितीतले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही पीडित मॉडेलने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. २०१८ साली Metoo कँपेनदरम्यानही भुषण कुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT