Tak इंडिया टुडे ग्रुपचा पहिला डिजिटल ब्रांड, आता घेऊन आलोय कर्नाटक Tak
इंडिया टुडे ग्रुपने आता कर्नाटकसाठी त्या राज्यातल्या विशेष बातम्या, लेख, व्हीडिओ यांसाठी नवं चॅनल आणलं आहे. कर्नाटक Tak हे नवंकोरं चॅनल तुमच्या भेटीला येतं आहे. हे स्थानिक चॅनल कर्नाटकमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असेल. बातमीमागची बातमी सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कानडी भाषिकांसाठी आम्ही हे खास चॅनल घेऊन येत आहोत. या बाबत बोलताना Tak चे मॅनेजिंग […]
ADVERTISEMENT

इंडिया टुडे ग्रुपने आता कर्नाटकसाठी त्या राज्यातल्या विशेष बातम्या, लेख, व्हीडिओ यांसाठी नवं चॅनल आणलं आहे. कर्नाटक Tak हे नवंकोरं चॅनल तुमच्या भेटीला येतं आहे. हे स्थानिक चॅनल कर्नाटकमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असेल. बातमीमागची बातमी सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कानडी भाषिकांसाठी आम्ही हे खास चॅनल घेऊन येत आहोत.
या बाबत बोलताना Tak चे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर म्हणाले की भारताच्या गेल्या जनगणनेप्रमाणे ६०० दशलक्ष लोक असे आहेत ज्यांची मूळ भाषा हिंदी नाही. एक ब्रँड म्हणून, आम्हाला या भाषिक अडथळे ओलांडून पुढे जायचं आहे आणि गेल्या दोन वर्षांत, आम्ही हळूहळू हिंदीच्या पलीकडे विस्तारलो आहोत. गुजरात, पंजाब सारख्या प्रादेशिक बाजारपेठांमध्ये आम्ही चॅनल्स लॉन्च केले आहेत.
Tak ने आत्तापर्यंत विविध विषयांवर १९ चॅनल्स सुरू केली आहेत. त्यापैकी ११ कंटेट जनरेट करणारी आहेत. खेळ, लाईफस्टाईल, भविष्य, गुन्हे, व्यवसाय, इतिहास आणि स्थानिक बातम्या असे सगळे विषय आम्ही याद्वारे कव्हर केले आहेत.
वापरकर्त्याच्या पसंतीनुसार आणि त्यांना वापरण्यास सोपं जाईल असं करण्यासाठी अॅप कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर तयार केले गेले आहे. Tak ने आता कर्नाटक तक सह २० चॅनल्स आणली आहेत.