पोहरादेवीतील ‘गर्दी’वर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पोहरादेवीतील गर्दीबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थकांची गर्दी झाली होती. याबाबत येणाऱ्या बातम्यांची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. कोविडच्या काळात अशा पद्धतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यासंबंधीचा अहवाल द्यावा अशाही सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीचाही आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. वर्षा बंगल्यावर यासंबंधीची बैठक पार पडली. मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोरोनाविरोधात लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT