शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले तानाजी सावंत कोण?, कसा आहे आजपर्यंतचा प्रवास?

मुंबई तक

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाले. दोन्ही पक्षातील 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिक्षण, कारखानदारीसह सावंतांनी राजकारणात देखील आपली छाप सोडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत बंड करत तानाजी सावंत उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडले होते. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाले. दोन्ही पक्षातील 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिक्षण, कारखानदारीसह सावंतांनी राजकारणात देखील आपली छाप सोडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत बंड करत तानाजी सावंत उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मंत्रिपद आले आहे.

कोण आहेत तानाजी सावंत?

तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव या गावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली ठसा उमटवला. पुण्यात त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.

तानाजी सावंतांची राजकीय कारकीर्द

हे वाचलं का?

    follow whatsapp