Accident : शेगावला जाताना काळाचा घाला; ‘समृद्धी’वर ६ गजानन भक्तांचा मृत्यू
Shegaon | Samruddhi Highway | Accident : बुलढाणा : शेगावला जाणाऱ्या भाविकांची भरधाव गाडी उलटल्याने ६ ठार तर ६ गंभीर जखमी झाले. आज (रविवारी) सकाळी मेहकर-सिंदखेड राजादरम्यान, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ घडलेल्या या घटनेत ४ जणांचा जागीच तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ७ जखमींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयातील उपचारानंतर छत्रपती संभाजी नगरमधील खासगी […]
ADVERTISEMENT
Shegaon | Samruddhi Highway | Accident :
ADVERTISEMENT
बुलढाणा : शेगावला जाणाऱ्या भाविकांची भरधाव गाडी उलटल्याने ६ ठार तर ६ गंभीर जखमी झाले. आज (रविवारी) सकाळी मेहकर-सिंदखेड राजादरम्यान, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ घडलेल्या या घटनेत ४ जणांचा जागीच तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ७ जखमींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयातील उपचारानंतर छत्रपती संभाजी नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. (Accident: On the way to Shegaon to visit Gajanan Maharaj)
मृतांमध्ये हाैसाबाई भरत बर्वे (वय ६५), श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८), किरण राजेंद्र बाेरुडे (वय २८), प्रमिला राजेंद्र बाेरुडे (वय ५२), भाग्यश्री किरण बाेरुडे (वय २५), जान्हवी सुरेश बर्वे (वय ११) सर्व रा. एन ११ हुडकाे, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.
हे वाचलं का?
याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील बाेरुडे आणि बर्वे कुटुंबीय शेगाव येथे इर्टिगा कारने (MH 20 FU 8962) रविवारी सकाळी जात हाेते़. मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटली. ३ ते ४ वेळा पलटी खाल्ल्याने कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली़. यामध्ये ४ जण जागीच ठार तर २ जणांचा मेहकर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?
ADVERTISEMENT
या अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात हलवले़. जखमींमध्ये कार चालक सुरेश भरत बर्वे (वय ३५), नम्रता रविंद्र बर्वे (वय ३२), इंद्र रविंद्र बर्वे (वय १२), साैम्य रविंद्र बर्वे (वय ४ वर्ष), जतीन सुरेश बर्वे (वय ४ वर्ष), वैष्णवी सुनील गायकवाड (वय १९ वर्ष), यश रविंद्र बर्वे (वय १०) आदींचा समावेश आहे़. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी पाेलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पाहणी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT