महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती, एक खास रिपोर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही धडकी भरवणारी आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोनाचे दररोज 35 ते 40 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. अशावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा विचार करत आहे. त्यातील 5 असे जिल्हे आहेत की, जिथे परिस्थिती अत्यंत भयंकर असल्याचं दिसून आलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील पाच जिल्हे असे आहेत की, जिथे कोरोना व्हायरसचा अक्षरश: स्फोट झाला आहे. कारण आजच्या घडली या पाच जिल्ह्यात मिळून एकूण 2 लाख 46 हजार 655 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात 3 लाख 66 हजार 533 रुग्ण आहे. त्यामुळे आता आपल्याला कल्पना येईल राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने केवढ्या मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे.

‘या’ 5 जिल्ह्यात आहेत सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient)

हे वाचलं का?

  • पुणे- 64599

  • मुंबई- 54807

  • ADVERTISEMENT

  • नागपूर – 48806

  • ADVERTISEMENT

  • ठाणे- 42151

  • नाशिक – 36292

  • 1. पुणे – राज्यात कोरोनाची सर्वात भयंकर परिस्थिती ही पुण्यात आहे. कारण पुण्यात कोरोनाचा संसर्ग हा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यातही राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात सध्या 64 हजार 599 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 8343 जणांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.

    2. मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती सध्या अधिक बिघडत चालली आहे. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्या मुंबईत 54 हजार 807 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पण मृतांच्या बाबतीत मुंबई मात्र सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. कारण आतापर्यंत मुंबईत 11 हजार 708 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबईत Corona चा कहर दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

    3. नागपूर – अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत नागपूर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारण आता नागपूरमध्ये 48 हजार 806 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे 15 मार्चपासून कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लॉकडाऊन काहीशी सूट देण्यात आली होती. दरम्यान, गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

    4. ठाणे – मुंबईच्या सर्वात जवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या बरीच वाढत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. कारण इथे सध्याच्या घडीला 42 हजार 151 कोरोना रुग्ण आहेत. तर मृतांच्या बाबतीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारण आतापर्यंत 5,980 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्रात भंयकर परिस्थिती; गेल्या 24 तासात 249 जणांचा मृत्यू, 43 हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण

    5. नाशिक – कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्ह्यात संसर्ग हा फारच कमी असल्याचं दिसून आलं होतं. पण मागील काही महिन्यात येथे कोरोनाच संसर्ग झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 36 हजार 292 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यातील कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी काय आहे?

    राज्यात आतापर्यंत 28 लाख 56 हजार 163 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी 24 लाख 33 हजार 368 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 54 हजार 868 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राज्यात सध्या 3 लाख 66 हजार 533 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT