Thane Crime: स्वत:च्याच बायकोचे अश्लील व्हिडीओ शूट केले, मित्रांना पाठवले आणि थेट...
Thane Crime: ठाण्यात एका 40 वर्षीय व्यक्तिला त्याच्याच पत्नीचं शोषण, छळ आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

स्वत:च्याच बायकोचे अश्लील व्हिडीओ शूट केले

पोलिसांकडून आरोपीला अटक

आरोपीने पतीचे व्हिडीओ शूट करुन मित्रांनाही पाठवले
Ulhasnagar crime case:पती-पत्नीमधलं नातं हे विश्वासाचं आणि आधाराचं नातं म्हणून पाहिलं जातं. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यातून समोर आलेल्या एका प्रकरणामुळे या नात्याला काळिमा फासल्या गेल्याचं म्हटलं जातंय. एका नराधमाने स्वतःच्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवून नंतर त्याच्या मित्रासोबत शेअर करून नात्याला लाज आणल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा >>Nandurbar : दोन वाहनांची धडक, भांडण आणि थेट दगडफेक, नंदुरबारमध्ये तणाव, नेमकं प्रकरण काय?
ठाण्यात एका 40 वर्षीय व्यक्तिला त्याच्याच पत्नीचं शोषण, छळ आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी उल्हासनगर शहरातून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी सांगितलं की, तक्रारीनुसार, आरोपीने त्याच्या पत्नीला मादक पदार्थ दिले. यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर त्याच्या मित्राला पाठवलं. जेव्हा या महिलेनं छायाचित्रांबद्दल विरोध केला तेव्हा आरोपीने तिला मारहाणही केली.
हे ही वाचा >> Mumbai Police : धारावीत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक, काय समोर आलं?
महिलेच्या तक्रारीनुसार या सगळ्या घटनेनंतर, 17 जानेवारी रोजी तिच्या पतीच्या मित्राने तिला फोन केला आणि तिच्याशी वाईट पद्धतीनं संभाषण केलं. फोनवरून या महिलेला थेट शरिरसुखाची मागणी केली. महिलेच्या तक्रारीवरून, आरोपींवर कलम 77 , 78 , 115(2) (स्वेच्छेने दुखापत करणे), 352 (गुन्हेगारी धमकी) आणि कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 366. भारतीय दंड संहिता आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.