Thane Bike Accident : खड्डा चुकवायला गेला आणि जीव गमावून बसला; ठाण्यातील दुर्दैवी घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना घोडबंदर रोड येथे घडली. हा तरूण रस्त्यावरचा खड्डा चुकवायला गेला आणि त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला इजा झाली. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

हा तरूण मुंब्रा या ठिकाणी राहात होता. घोडबंदर रोडवरून जात असताना तो वाटेत आलेला खड्डा चुकवायला गेला. मात्र त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने ठाणे येथील सरकारी रूग्णालयात आणण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कासारवडवली पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अशा प्रकारे अपघात होण्याची ही गेल्या आठवड्यातील दुसरी घटना आहे. याआधी 16 सप्टेंबरला एक महिला आणि तिचा मुलगा या दोघांचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला. मुंबई नाशिक हायवेवर असलेल्या माणकोली नाक्यावर ही घटना घडली होती. हे दोघेही एका नातेवाईकाच्या घऱी गणपती असल्याने दर्शन घ्यायला गेले होते. तिथून परतत असताना या दोघांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी आणखी एका बाईक स्वाराचा ठाण्यातील खड्ड्यांमुळे मृत्यू झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT