लसीसाठी बनावट ओळखपत्र : आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर, ठाणे मनपाच्या अहवालात धक्कादायक खुलासा
ठाण्यात काही दिवसांपूर्वी मीरा चोप्रा या अभिनेत्रीने लस घेण्यासाठी कोविड सेंटरचं बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. सोशल मीडियावर आणि विरोधकांनी या प्रकरणी गदारोळ केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून यात आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलंय. लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर, […]
ADVERTISEMENT

ठाण्यात काही दिवसांपूर्वी मीरा चोप्रा या अभिनेत्रीने लस घेण्यासाठी कोविड सेंटरचं बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. सोशल मीडियावर आणि विरोधकांनी या प्रकरणी गदारोळ केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून यात आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलंय.
लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर, ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघड
अभिनेत्री सौम्या टंडन हीने देखील लस घेण्यासाठी अशाच पद्धतीने बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचं समोर आलंय. भाभीजी घर पर है या मालिकेत अनिता भाभी हे पात्र साकारणारी सौम्या टंडन हिने लस घेतली की नाही हे चौकशी समितीने स्पष्ट केलेलं नाही. परंतू सौम्या टंडनला लगेच लस देण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे ओम साई केअर कंपनीमार्फत बनावट आयडी कार्ड बनवण्यात आल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. आतापर्यंत चौकशी समितीच्या अहवालात २१ जणांना बनावट ओळखपत्राच्या आधारावर लस देण्यात आल्याचं समोर आलंय.
एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांना लस मिळत नसताना काही सेलिब्रेटींसाठी अशा पद्धतीने बनावट आयडी कार्डाद्वारे लस दिली जात असल्यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेने या प्रकरणाची चौकशी समिती नेमली होती.










