ऑस्करला गवसणी घालणाऱ्या ‘The Elephant Whisperers’ ची काय आहे कहाणी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

The Elephant Whisperers win oscar : 95 व्या अकादमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अवॉर्डमध्ये एसएस राजामौलीच्या आरआरआर सिनेमातील नाटू नाटू (Naatu Naatu)गाण्याने बेस्ट ओरिजनचा सॉंगचा पुरस्कार जिंकला.या पु्रस्कारासह ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने (‘The Elephant Whisperers’) बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. हा अवॉर्ड जिंकल्यानंतर दोन महिलांनी हे करून दाखवलं, ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला ऑस्कर मिळाल्याचे ट्विट गुनीत मुंगा यांनी केले होते. दरम्यान भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ची नेमकी स्टोरी काय आहे? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.(the elephant whisperers win best documentary short film award in oscar guneet monga film what was the story)

ADVERTISEMENT

दक्षिण भारतातली ही कहानी आहे. या कहानीत तमिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पात राहणारे एक कुटूंब दोन अनाथ हत्तीना दत्तक घेते. या कहानीत निसर्गाशी नाळ जोडलेले बोमन आणि बेली पुढे प्राण्याशी नाळ जोडतात. बोमन हा वनखात्यात नोकरीला असतो.एके दिवशी रघू नावाचा हत्ती त्याच्याजवळ येतो. या रघू नावाच्या हत्तीच्या शेपटीला कुत्र्याने चावले असते. आणि इथून सर्व कहानी सुरु होते.

Naatu Naatu Win oscar: ऑस्करमध्येही ‘नाटू नाटू’चे घुमले सूर! पटकावला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ अवॉर्ड

हे वाचलं का?

बोमन रघूवर उपचार करतो आणि त्याला बरा करतो. या फिल्ममध्ये बोमन आणि बेली रघूची मुलाप्रमाणे काळजी घेतात. बोमन त्याला त्याच तलावात अंघोळ घालतो, ज्या तलावात तो स्वत: अंघोळ करत असे.तसेच बेली देखील रघूला त्याच हातानी खाऊ घालते, ज्या हाताने ती स्वत; खाते.त्याच्या एकजूटीमुळे रघूला बरा होतो आणि त्यांचे कुटूंब बनते. या कहानीत दोन सोडून गेलेले हत्ती आणि त्याचे काळजीवाहू यांच्यातील अतूटबंध दाखविण्यात आला आहे. ही स्टोरी भावनात्मकदृष्ट्या समृद्ध करणारी कथा आहे जी बिनशर्त प्रेमाचे उदाहरण म्हणून यशस्वी होते.

Oscar: ऑस्करमध्ये भारताचा डंका! द एलिफंट व्हिस्परर्सने घडवला इतिहास

ADVERTISEMENT

या सिनेमात रघू नंतर त्यांच्याजवळ आणखीण एक हत्तीचे बाळ येते, त्याचे नाव अम्मू असते. अम्मु खुपच लहान असतो, त्यामुळे त्याची खुपच काळजी घेते.अशाप्रकारे ही स्टोरी पुढे सरकते. त्यानंतर रघूला बोमन आणि बेलीला सोडून जावे लागते. त्यावेळी हे बोमन, बेली आणि अम्मुला अवघड जाते. अत्यंत भावनिक असा हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहता पाहता कधी डोळ्यात पाणी येईल हे देखील कळणार नाही. या शॉर्ट फिल्मची निर्मिती गुनीत मोंगा (Guneet Monga)आणि सिख्या एंटरटेनमेंटचे अचित जैन यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

Oscar 2023: सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता; ऑस्करमध्ये कोणी मारली बाजी?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT