सासरी पाठवत नसल्याने सासऱ्याने सुनेच्या वडिलांचा हात चावला, सीसीटीव्हीत घटना कैद
धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या ठिकाणी असलेल्या बुजरूक या गावात कौटुंबिक कलहातून एक अजब घटना घडली आहे. सुनेला सासरी नांदायला पाठवत नसल्याने सासऱ्याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेताा. यात मुलीचे वडील जखमी झाले आहेत. या घटनेत मुलीचे वडील जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल […]
ADVERTISEMENT
धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या ठिकाणी असलेल्या बुजरूक या गावात कौटुंबिक कलहातून एक अजब घटना घडली आहे. सुनेला सासरी नांदायला पाठवत नसल्याने सासऱ्याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेताा. यात मुलीचे वडील जखमी झाले आहेत. या घटनेत मुलीचे वडील जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वसंत महादेव राऊत हे अकोला जिल्ह्यातील बुरूजक मधल्या देवीपुरा भागात राहतात. त्यांच्या मुलीचं लग्न चार वर्षांपूर्वी संग्रामपूर येथील पाथर्डा या ठिकाणच्या राहुल रमेश इंगळेसोबत झालं. मात्र घरगुती वाद झाल्याने मुलगी मागच्या आठ महिन्यांपासून माहेरी येऊन राहात होती. मुलीला सासरी पाठवण्यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. यावेळी वसंता राऊत आणि रमेश इंगळे यांच्यात झटापटही झाली. याच झटापटीत रमेश इंगळे यांनी वसंता राऊत यांच्या हाताचा कडकडून चावा घेतला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हे वाचलं का?
काय म्हटलं आहे मुलीने?
ADVERTISEMENT
माझ्याशी माझे पती लग्नानंतर चांगले वागले. त्यानंतर मला छोट्या छोट्या गोष्टींवरून मारहाण करण्यास सुरूवात केली. लग्नानंतर दीड वर्षानी मला मुलगी झाली. हे कारण काढूनही माझ्या पतीने मला मारहाण केली. तसंच तो माझ्याशी सतत भांडण करत असत. भुसावळमध्ये ते काम करत आहेत. त्यांनी माझा फोनही फोडला होता. मी आई वडिलांना काही सांगितलं किंवा काही तक्रार केली तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. एक दिवस त्यांनी मला इतकी मारहाण केली की माझ्या कंबरेला दुखापत झाली. त्या दिवशी त्यांनी माझ्या मुलीलाही उपाशी ठेवलं. त्यामुळे मी सासर सोडून माहेरी निघून आले.
ADVERTISEMENT
मी माहेरी आल्यानंतर त्यांचे वडील आणि माझे पती घरी आले. मात्र काही दिवसांपूर्वीही ते घरी आले होते. त्यावेळी त्यांनी मला सासरी चल असं सांगितलं. मी ऐकलं नाही. त्यावेळी त्यांनी माझ्या भावाला आणि माझ्या वडिलांना त्रास दिला आहे. तसंच त्यांना चावाही घेतला. मला न्याय मिळवून दिला गेला पाहिजे म्हणून मी विनंती करते असं या मुलीने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT