प्रेमसंबंधातून काढला मुलीच्या वडिलांचा काटा; नागपुरातील द्विवेदी हत्या प्रकरणाचा असा झाला खुलासा
योगेश पांडे, नागरपूर, प्रतिनिधी नागपूर: नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली, त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी (काल) सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागरपूर, प्रतिनिधी
नागपूर: नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली, त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे.
रविवारी (काल) सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जवळच नारायण द्विवेदी यांची भर रस्त्यात हत्या झाली होती. नारायण यांची हत्या मृतकाच्या जुन्या घर मालकाच्या 20 वर्षीय मुलानेच केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलराम पांडे या घर मालकाचा मुलाला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीचे आरोपीचे नारायण द्विवेदींच्या मुली सोबत प्रेमसंबंध
आरोपी बलराम पांडेचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचा पाठलाग करायचा, छेड काढायचा याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळेला बालरामला समजावले होते. त्यांनी बालरामच्या वडिलांना ही माहिती दिली होती. बलरामच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबाने पांडे यांचे घर सोडून जाण्याचा निर्धार केला.