भारतीय धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा!
२०१८ मध्ये इंडिया टुडेच्या कॉनक्लेवमध्ये सोनिया गांधी यांनी एक गोष्ट मान्य केली होती. ती गोष्ट ही होती की भाजपने भारतातल्या बहुतांश लोकांना हे पटवून दिलं होतं की काँग्रेस ही एक मुस्लिम धार्जिणा पक्ष आहे. सोनिया गांधींनी प्रांजळपणे ही कबुली देणं याचा दुसरा अर्थ हा होता की राजकीय हिंदुत्वापुढे नेहरूंनी आणलेली धर्मनिरपेक्षता ह एक प्रकारे अपयशी […]
ADVERTISEMENT

२०१८ मध्ये इंडिया टुडेच्या कॉनक्लेवमध्ये सोनिया गांधी यांनी एक गोष्ट मान्य केली होती. ती गोष्ट ही होती की भाजपने भारतातल्या बहुतांश लोकांना हे पटवून दिलं होतं की काँग्रेस ही एक मुस्लिम धार्जिणा पक्ष आहे. सोनिया गांधींनी प्रांजळपणे ही कबुली देणं याचा दुसरा अर्थ हा होता की राजकीय हिंदुत्वापुढे नेहरूंनी आणलेली धर्मनिरपेक्षता ह एक प्रकारे अपयशी ठरू लागली होती. हिंदुत्वाच्या लाटेपुढे ही नेहरूंनी आणलेल्या धर्मनिरपेक्षतेचा असर कमी होऊ लागला होता. २०१४ च्या अँटनी समितीच्या अहवालातही काँग्रेस हा पक्ष मुस्लिम धार्जिणा आणि हिंदू विरोधी आहे असे शब्द वापरण्यात आले मात्र ते जाहीर केले गेले नाहीत. सोनिया गांधी यांनी दिलेल्या प्रांजळ कबुलीचा अर्थ काँग्रेसची धर्मनिरपेक्षतेची ओळख पुसली जात आहे असाच ठरला.
२०१७ मध्ये म्हणजेच २०१४ च्या निवडणूक निकालानंतर तीन वर्षांनी जी निवडणूक आली त्यावेळीही काँग्रेस पक्षासाठी हा त्रास आणखी वाढला. कारण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष या इमेजवर पुन्हा एकदा भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि काँग्रेस पक्षाने मुस्लिम पक्षांशी जुळवाजुळव केल्याचा आरोप झाला. केरळमध्ये काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीग यांची जुनी युती आहे. या दोन्ही पक्षांवर टीका करण्यासाठी भाजप आणि डावे पक्ष हे या दोघांना वारंवार लक्ष्य करत राहिले. काँग्रेसने मुस्लिम लीगला इतर धर्मीयांपेक्षा झुकतं माप दिलं आहे अशीही टीका झाली. आसाममध्ये काँग्रेसने परफ्युम व्यवसाय आणि राजकारणात असलेल्या बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटीक फंड सोबत हातमिळवणी केली.
AIUDF हा तो पक्ष होता ज्या पक्षाने बंगाली बोलणाऱ्या मुस्लिम स्थलांतरितांचं नेतृत्व केलं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस हा पक्ष डाव्या पक्षांच्या आघाडीचा एक भाग आहे. यामध्ये आता इंडियन सेक्युलर फ्रंट अर्थात आयएसएफचाही समावेश आहे. हा पक्ष तेथील स्थानक अब्बास सिद्दीकी यांनी सुरू केला. अब्बास सिद्दीकी हे त्यांच्या वादग्रस्त भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपने घेतला. आपली हिंदू व्होट बँक कशी राखता येईल हे भाजपने या दोन्ही राज्यांमध्ये पाहिलं. त्यासाठी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयांचा भाजपला फायदा झाला. केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिम पक्षांसोबत हातमिळवणी करणं हे पक्षातंर्गत वादाची ठिणगी ठरलं. कारण काँग्रेसने अगदी सुरूवातीपासून आपली धर्मनिरपेक्ष ही ओळख जपली होती या इमेजला तडा जाण्याचं काम या निर्णयांनी केलं.