तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपच्या अडचणी आणखी वाढणार, ‘हे’ आहे कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म डायरेक्टर अनुराग कश्यप हे दोघेही सध्या इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी काल इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तापसी आणि अनुराग यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांचीही जवळपास सहा तास चौकशी केली.

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात दोन वेगवेगळ्या केसेस आहे. इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सर्च ऑपरेशनदरम्यान प्रॉडक्शनमधील गैरव्यवहारासंदर्भात पुरावे मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामधून दोन वेगवेगळी प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये एक फँटम फिल्मच्या शेअरहोल्डर्स विरोधात आहे आणि दुसरं प्रकरण हे अभिनेत्री तापसी पन्नूच्या विरोधात आहे. तापसी पन्नू आणि तिच्या कंपनी विरोधात 25 करोड रूपयांच्या आयकर बुडवल्याचा आरोप आहे. तिच्या कंपनीवर देखील आयकर बुडवल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

तापसीच्या प्रकरणात बुधवारी यांचा जबाब नोंदवण्यात आला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तर आज पुन्हा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की तिच्या मोबाइल फोनवरून काही डेटा डिलीट करण्यात आला आहे. दरम्यान इन्कम टॅक्स विभागाचीस तज्ज्ञ डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. तिला येत्या काही दिवसांत पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दुसरं प्रकरण फँटम फिल्म्सशी निगडीत आहे. फॅंटम फिल्म्सच्या शेअरहोल्डर्सवर सुमारे 600 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स चोरीचा संशय आहे. शेअरहोल्डर्सनी फॅंटम फिल्म्सचा हिस्सा विकला मात्र त्याद्वारे मिळवलेल्या नफ्यावर त्यांनी कर भरला नाही. त्यांनी बनावट खर्च दाखवून बनावट बिलंही बनवण्यात आली.

तापसी आणि अनुराग प्रकरणातल्या महत्त्वाच्या बाबी

-तापसी पन्नूच्या सगळ्या जाहिराती, काँट्रॅक्ट्स यावर आयकर विभागाची नजर आहे

-तिने कोणत्या सिनेमासाठी किती साईनिंग अमाऊंट घेतली यावरही आयकर विभाग लक्ष ठेवून आहे

-बुधवारी तापसीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला आहे

-तापसीला चौकशीसाठी येत्या काही दिवसात आयकर विभाग समन्स बजावू शकतो

-आयकर विभागाला तापसी पन्नूने कर बुडवल्यासंबंधीचे काही पुरावेही मिळाले आहेत.

तापसी पन्नु आणि अनुराग कश्यपच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड

फँटम फिल्म संदर्भात…

-फँटम फिल्म्सच्या शेअर होल्डर्सनी ६०० कोटींचा कर बुडवल्याची शक्यता आहे

-फँटम फिल्म्सच्या शेअर होल्डर्सनी बोगस आणि खोटी बिलं सादर केली आहेत

-या सगळ्या शेअऱ होल्डर्सच्या फोनमधला आणि अनुराग कश्यपच्या फोनमधला महत्त्वाचा डेटा गायब आहे

-मोबाईल डेटा परत मिळवण्यासाठीचे आयटी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT