साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असू नये ही भूमिका योग्य नाही, गडकरींनी टोचले साहित्यिकांचे कान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर

ADVERTISEMENT

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये ही भूमिका योग्य नाही. साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणीही एक आहे असे सांगतानाच एक दुसऱ्याशी आपला संबंधच असता कामा नये ही गोष्ट योग्य होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्यिकांचे कान टोचले. ते विदर्भ साहित्य संघ शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना त्यांनी ही भूमिका घेतली.

‘देवबाभळी’ पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार, प्राजक्त देशमुख मानकरी

हे वाचलं का?

राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा संबंध साहित्यिकाशी आहे. प्रत्येकाने मर्यादा, जबाबदारी आणि कर्तव्याच्या बाबतीत आपली लक्ष्मणरेषा ठरवणे आवश्यक असून ती ठरवण्याची वेळ आता आली आहे असे गडकरींनी सुनावले. नागपुरला झालेल्या साहित्य संमेलनाकरीता माझ्यासह सर्वच राजकारणी निधी संकलन करीत होते. त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नकोत, असे वक्तव्य केले.

ADVERTISEMENT

तो त्यांचा अधिकार होता. पण चांगल्या साहित्यामुळे राजकारणात गुणात्मक परिवर्तन होते. भूतकाळातील साहित्य, इतिहास, संस्कृती वारसा घेऊन भावी पिढी निर्माण होणार आहे. चांगल्या साहित्यातून राजकारणालाही चांगली दिशा मिळू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

ADVERTISEMENT

राजकारण, समाजकारण व तरूण पिढीला साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास व वारसा महत्वाचा असतो. त्यामुळे साहित्य संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत लोकांपर्यत पाेहोचले पाहिजे, असे ते म्हणाले.

साहित्य संघाच्या उपक्रमात लोक येत नाहीत. निवडक प्रतिसाद मिळतो. संघ अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपल्यातील दोष दूर केले पाहिजे. आपण आपल्यात काय बदल करू शकतो. याचा विचार साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असा सल्लाही गडकरींनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT