पवित्र रिश्ता मालिकेचा सिक्वल येणार; अंकिता लोखंडे साकारणार अर्चनाची भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लवकरच टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच पवित्र रिश्ता 2 लोकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या मालिकेचा पाहिला सिझन फार गाजला होता. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडीही प्रेक्षकांना फार आवडली होती.

ADVERTISEMENT

त्यानंतर आता पुन्हा एकदा पवित्र रिश्ता 2 डिजीटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर या मालिकेच्या सिक्वलची फार चर्चा होती. तर मिळालेल्या माहितीनुसार, पवित्र रिश्ता मालिकेच्या सिक्वेलमध्ये अर्चना देशमुखच्या भूमिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे दिसणार आहे. सुशांत सिंग राजपूतने साकारलेली मानव ही भूमिका कोण साकारणार यासाठी मेकर्स विचार करत आहेत.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील मानव-अर्चनाच्या जोडीला लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं. दोघांचा स्वभाव तसंच प्रेम यामुळे ही जोडी फॅन्सशी आवडती जोडी बनली होती. दरम्यान मानवच्या भूमिकेत जो नवीन अभिनेता असेल त्या अभिनेत्यामध्ये प्रेक्षक सुशांत सिंग राजपूतला पाहतील. त्यामुळे ही भूमिका करणं कोणत्याही अभिनेत्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे.

हे वाचलं का?

पवित्रा रिश्ता या मालिकेत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आणि तसंच ‘बाघी’ या सिनेमांमधून बॉलिवूडमध्येही काम केलंय. आता पवित्र रिश्ता 2च्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT