डोंबिवली : चोरी करायला गेला आणि जीव गमावला, आठव्या मजल्यावरुन पडून चोराचा मृत्यू

मुंबई तक

चोरीच्या उद्देशाने निर्माणाधीन इमारतीत शिरलेल्या एका चोराचा आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद सलीम भाटकर असं या मृत चोराचं नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सराईत गुन्हेगार होता. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरातील गरिबांसाठी खंबाळपाडा परिसरात बीएसयुपी योजनेअंतर्गत इमारती बांधल्या जात आहेत. या इमारतीमधील सदनिकांचा ताबा अद्याप लाभार्थ्यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

चोरीच्या उद्देशाने निर्माणाधीन इमारतीत शिरलेल्या एका चोराचा आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद सलीम भाटकर असं या मृत चोराचं नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सराईत गुन्हेगार होता.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरातील गरिबांसाठी खंबाळपाडा परिसरात बीएसयुपी योजनेअंतर्गत इमारती बांधल्या जात आहेत. या इमारतीमधील सदनिकांचा ताबा अद्याप लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या नसल्यामुळे या इमारती भग्नावस्थेत पडून आहेत. त्यामुळे अनेक भुरटे चोर या इमारतीमधून ग्रिल, दरवाजे आणि इतर साहित्य चोरून नेत आहेत.

अरफाह पिंजारी आणि मोहम्मद भाटकर हे दोन चोर इलेक्ट्रीक वायर चोरण्यासाठी सोमवारी रात्री या इमारतीत शिरले. परंतू वॉचमनला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेतली. वॉचमन येत असल्याचं कळताच घाबरलेल्या दोन्ही चोरांनी ड्रेनेज पाईपलाईनवरुन खाली उतरण्यास सुरुवात केली. यावेळी हात निसटल्यामुळे मोहम्मद आणि पिंजारी हे दोन्ही चोर खाली कोसळले. यात जबर मार लागल्यामुळे मोहम्मदचा जागेवरच मृत्यू झाला तर पिंजारी जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमपासाठी पाठवला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp