“नायजेरियातून आणलेल्या चित्त्यांमुळे लंपी आजार पसरला” नाना पटोलेंचा अजब दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लंपी या आजाराची लागण गाय, बैल, म्हैस यांना होताना दिसते आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाला आहे. लंपी रोगाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच रोगाचा संसर्ग जनावरांमध्ये पसरू नये यासाठीही काळजी घेतली जाते आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लंपी या रोगाबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटले आहेत नाना पटोले लंपी या रोगाबाबत?

“लंपी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरचे ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणूनबुजून शेतकऱ्यांचं नुकसान चित्त्यांना भारतात आणलं” असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

नाना पटोले यांच्या वक्तव्याला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलं उत्तर

नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उत्तर दिलं आहे. नाना पटोलेजी चित्ते नामिबियातून आणले आहेत, नायजेरियातून नाही. असं म्हणत हात जोडणारा इमोजीही त्यांनी यासोबत जोडला आहे.

हे वाचलं का?

नामिबियातून आठ चित्ते भारतात

भारतात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ७० वर्षांहून अधिक काळ चित्ते नामशेष झालेल्या या विशिष्ट प्रजातीचं पुनरागमन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आठ चित्ते आणण्यात आले आहेत. नामिबियातून आणलेल्या या चित्त्यांना कुनो या अभयारण्यात सोडण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

राम कदम यांनीही दिलं नाना पटोलेंना उत्तर

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक अजब शोध लावला आहे. त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात चित्ते आले त्यांच्यामुळे जनावरांमध्ये लंपी आजार पसरला. काय झालंय काय काँग्रेसच्या नेत्यांना? माध्यमांनी आपल्या बातम्या दाखवव्यात यासाठी हा सगळा खटाटोप आहे की बुद्धिमत्तेची घसरण? नेमकं काय चाललंय? या अभूतपूर्व शोधासाठी काँग्रेस पक्षाला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे असाही टोला राम कदम यांनी लगावला.

ADVERTISEMENT

लंपी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?

या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते. लंपीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो. जनावरे चारा खाणे, पाणी पिण्याचा प्रमाण कमी होतो.हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर तसेच कानामागे सूज येते.जनावरे दूध देण्यास कमी पडतात.

शेतकऱ्यांना बसतोय लंपी व्हायरसचा फटका

देशातील अनेक राज्यात लंपी स्किन या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे हजारो जनावरांना याची लग्न झाली आहे. संक्रमण झालेल्या जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटातून जावं लागत आहे. कारण शेतीसह शेतकऱ्यांचा दुधाचा जोड व्यवसाय असतो. त्यामुळे दूध कमी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. म्हणून यावर शासनाने तात्काळ उपाययोजना आणाव्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT